Top Social Media App eSakal
विज्ञान-तंत्र

Social Media : इन्स्टाग्राम, टिकटॉक की फेसबुक? कोण ठरलं यंदाचं नंबर वन सोशल मीडिया अ‍ॅप? जाणून घ्या

Top Social Media App : या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जगभरात इन्स्टाग्राम डाऊनलोड करण्याचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलं आहे.

Sudesh

Most Downloaded Social Media App : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप कोणतं, असं विचारल्यानंतर तुम्ही कदाचित फेसबुक किंवा टिक-टॉक असं उत्तर द्याल. मात्र या दोघांनाही मागे टाकून इन्स्टाग्राम हे या यादीमध्ये टॉपला पोहोचलं आहे. सेन्सर टॉवरने याबाबतची माहिती दिली आहे.

या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जगभरात इन्स्टाग्राम डाऊनलोड करण्याचं प्रमाण 20 टक्क्यांनी वाढलं आहे. 2023 या वर्षामध्ये 76.7 कोटी वेळा इन्स्टाग्रामला डाऊनलोड (Instagram Downloads) करण्यात आलं. याच वर्षामध्ये चिनी अ‍ॅप टिकटॉकला 73.3 कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आलं.

इन्स्टाग्राम कसं झालं प्रसिद्ध?

इन्स्टाग्रामने 2020 साली रील्स हे शॉर्ट व्हिडिओ फीचर लाँच केलं होतं. टिकटॉकने आणलेल्या या ट्रेंडचा इन्स्टाग्रामने चांगला फायदा करून घेतला. यूजर्सना देखील शॉर्ट व्हिडिओंसाठी वेगळ्या अ‍ॅपमध्ये जाण्याची गरज नसल्यामुळे इन्स्टाग्रामचा वापर अधिक वाढला. (Why Instagram is Popular)

फीचर्स (Features)

यासोबतच, इन्स्टाग्राम वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स देत असतं. इनबॉक्समध्ये सेफ्टी फीचर्स देणं, रील्स तयार करण्यासाठी टेम्प्लेट पुरवणं आणि वेळोवेळी यूजर्सना मोटिव्हेट करणं या गोष्टींमुळे इन्स्टाग्राम लोकप्रिय अ‍ॅप झालं आहे.

टिकटॉक बॅनचा फायदा (Benefits of TikTok ban)

दरम्यान, इन्स्टाग्रामला टिकटॉक हे अ‍ॅप कित्येक देशांमध्ये बॅन असण्याचाही फायदा मिळाला. अब्जावधी यूजर्स असणाऱ्या भारतात देखील टिकटॉक बॅन आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये हे अ‍ॅप बॅन करण्यात आलं असून, आता इतर राज्येही याबाबत विचार करत आहेत. (TikTok Ban)

टाईम स्पेंडच्या बाबतीत 'टिकटॉक'च किंग

दरम्यान, इन्स्टाग्राम हे सर्वाधिक डाऊनलोड केलेलं अ‍ॅप असलं, तरीही वापर करण्याच्या बाबतीत अजूनही टिकटॉक पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, टिकटॉकवर यूजर्स सरासरी 95 मिनिट वेळ अ‍ॅक्टिव्ह असतात. इन्स्टाग्रामवर ही वेळ केवळ 62 मिनिटे आहे. याव्यतिरिक्त एक्स (ट्विटर) या अ‍ॅपवर सरासरी अ‍ॅक्टिव्ह वेळ 30 मिनिटे होता, तर स्नॅपचॅटवर 19 मिनिटे होता. (Social Media Active Users)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT