Instagram Teen Safety Features : आजकाल लहान मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेणं हे सगळ्यात अवघड काम झालं आहे. इन्स्टाग्रामवर तासन् तास स्क्रोल करणारी मुलं पाहिली की पुढच्या पिढीची चिंता वाटू लागते. आता मेटानेच लहान मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेसाठी इन्स्टाग्रामवर काही फीचर्स लाँच केले आहेत. यामध्येच एक फीचर असंही असणार आहे, ज्यामुळे लहान मुलं अधिक काळ इन्स्टाग्राम वापरू शकणार नाहीत.
टेकक्रंचने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम लवकरच 'नाईट टाईम नजेस' (Nighttime Nudges) नावाचं फीचर लाँच करणार आहे. यामुळे लहान मुलं रात्री उशीरापर्यंत इन्स्टाग्राम वापरू शकणार नाहीत. (Teen Safety on Instagram)
हे फीचर सक्रिय केल्यानंतर, इन्स्टाग्रामच्या चाईल्ड अकाउंटमध्ये रात्री दहा वाजेनंतर एक पॉपअप ओपन होईल. यामध्ये 'टाईम फॉर अ ब्रेक', 'खूप उशीर झाला आहे, आता इन्स्टाग्राम बंद करा' अशा आशयाचे संदेश दिसतील. रात्री दहानंतर जर दहा मिनिटे सलग इन्स्टाग्राम सुरू राहिलं तर हा पॉपअप समोर येईल. (Meta Safety Features)
इन्स्टाग्रामच्या सर्व चाईल्ड अकाउंट्सना हे फीचर आपोआप लागू होणार आहे. म्हणजेच, हे फीचर बंद करण्याचा पर्याय मुलांकडे नसणार आहे. पॉपअप विंडो आल्यानंतर ती क्लोज करण्याचा पर्याय मुलांकडे असेल. मात्र, हे फीचर पूर्णपणे बंद करता येणार नाही.
इन्स्टाग्रामचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी अॅपमध्ये आधीपासून काही पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 'टेक अ ब्रेक' (Take A Break), 'क्वाएट मोड' (Instagram Quiet Mode) अशा पर्यायांचा समावेश आहे. तुम्हाला जर इन्स्टाग्राम वापरण्याचा वेळ कमी करायचा असेल, तर या पर्यायांची मदत घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.