Instagram New Feature eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram New Feature : मित्रांच्या पोस्टमध्ये अ‍ॅड करता येणार आपले फोटो; इन्स्टाग्राम आणतंय खास फीचर - रिपोर्ट

Insta Feature : यासोबतच, इन्स्टाग्राम सेल्फी व्हिडिओ पोस्ट या फीचरवर देखील काम करत आहे.

Sudesh

इन्स्टाग्राम नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. एखादी पोस्ट शेअर करण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी इन्स्टा प्रयत्नशील असते. आता इन्स्टाग्राम असं फीचर आणत आहे, ज्यामुळे आपण आपल्या मित्रांच्या पोस्टमध्ये कंटेंट अ‍ॅड करु शकणार आहात.

कसं काम करेल फीचर?

या फीचरच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपल्या फॉलोवरच्या पोस्टमध्ये टेक्स्ट कंटेंट किंवा फोटो जोडू शकणार आहेत. यासाठी इन्स्टाग्रामच्या बॉटम-लेफ्ट कॉर्नरमध्ये एक वेगळं बटण देण्यात येईल. या माध्यमातून तुम्ही हा पर्याय सुरू करू शकणार आहात. हा पर्याय सुरू केल्यानंतर तुमचे फॉलोवर्स तुमच्या पोस्टमध्ये कंटेंट जोडू शकतील.

अर्थात, यासाठी 250 व्यक्तींची लिमिट ठेवण्यात आली आहे. म्हणजेच, एका पोस्टमध्ये जास्तीत जास्त 250 व्यक्ती आपला कंटेंट अ‍ॅड करू शकतील. ज्या व्यक्तीच्या पोस्टमध्ये दुसऱ्याने कंटेंट अ‍ॅड केला आहे, त्या व्यक्तीला याबाबत नोटिफिकेशन जाईल. यामध्ये तो कंटेंट अ‍ॅड करुन घ्यायचा की नाही हे ती व्यक्ती ठरवू शकणार आहे. (Tech News)

असा होणार फायदा

बऱ्याच वेळा एखाद्या सहलीला किंवा गेट टुगेदरला गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती आपापल्या फोनमध्ये फोटो काढून घेतात. त्यानंतर सगळ्यांकडून फोटो कलेक्ट करुन घेणं हे अत्यंत किचकट काम असतं. अशा वेळी हे फीचर कामी येऊ शकतं. तुमच्या पोस्टमध्ये दुसरी व्यक्ती आपल्याकडे असणारे फोटो देखील जोडू शकणार आहे. अर्थात, यासाठी तुम्ही दोघेही इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो केलेलं असायला हवं.

हे फीचर कधी लाँच होईल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. यासोबतच, इन्स्टाग्राम सेल्फी व्हिडिओ पोस्ट या फीचरवर देखील काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT