Instagram new features updates are coming soon on that you should know check list here  
विज्ञान-तंत्र

Instagram वापरणं होणार मजेदार; येतायत अनेक भन्नाट फीचर्स, पाहा यादी

सकाळ डिजिटल टीम

फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम (Instagram)चे करोडो वापरकर्ते आहेत. गेल्या एका वर्षात इंस्टाग्राम App भारतात सर्वाधिक डाउनलोड झाले आहे. वाढत्या यूजरबेसमुळे इंस्टाग्राम आपली सर्व्हिस आणखी सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. कंपनी आपल्या वापरकर्त्यांचा यूजर एक्सपिरिएंस अधिक सुधारण्यासाठी नवीन फीचर सादर करण्याच्या तयारीत आहे. इंस्टाग्रामवर लवकरच येणार्‍या काही फीचर्सची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

या फीचर्सच्या यादीमध्ये नवीन प्रोफाइल बॅनर, व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंग, 3D अवतार, रिलेसाठी वेळ मर्यादा, निर्मात्यांसाठी पेड सब्स्क्रिप्शन यासारख्या अनेक नवीन अपडेट्सचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी एका विशेष अपडेटवर देखील काम करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या होम फीडमध्ये त्यांना हव्या त्याच पोस्ट दिसतील. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

लवकरच तुम्हाला Instagram वर दोन पर्याय मिळतील, 'Following' आणि 'Favorites', ज्यामध्ये Following ऑप्शन तुम्ही फॉलो करत असलेल्या खात्यांवरील सर्व पोस्ट दाखवेल. तर Favorites ऑप्शन तुमच्या आवडत्या अकाउंटच्या पोस्ट होम फीडमध्ये दिसतील.

व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंग

इन्स्टाग्राम व्हिडीओ कॉलवर स्क्रीन शेअरिंग फीचरवरही काम करत आहे. मात्र, इन्स्टाग्राम हे फीचर कधी आणि कसे लागू करणार आहे, याबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही.

प्रोफाइल बॅनर

नुकतेच इंस्टाग्रामने युजर्ससाठी नवीन प्रोफाईल बॅनर फीचर जाहीर केले आहे. हे फीचर वापरकर्त्यांना त्यांचे शेड्यूल केलेले लाईव्ह इव्हेंट त्यांच्या प्रोफाइलवर शेअर करण्याची परवाणगी देईल. यासोबतच आगामी लाइव्ह इव्हेंट स्टोरीजद्वारे शेअर केला जाईल.

3D अवतार स्टोरीज (3D Avatars For Stories)

इन्स्टाग्रामने स्टोरीजसाठी अॅपल मेमोजीसारखे 3D अवतार देखील जाहीर केले आहेत. याच्या मदतीने वापरकर्ते स्वतःचा 3D अवतार तयार करून GIF च्या माध्यमातून स्टोरी शेअर करू शकतील. ही सुविधा सध्या रोलआउटच्या टप्प्यात आहे.

प्रोफाइल एम्बेड फीचर (Profile Embeds)

प्रोफाईल एम्बेडिंग हे एक नवीन फीचर आहे ज्याची इंस्टाग्रामने अलीकडेच यूएस मध्ये टेस्टिंग सुरू केली आहे. लवकरच ते इतर देशांमध्येही आणले जाण्याची शक्यता आहे. या अंतर्गत, पूर्ण इंस्टाग्राम प्रोफाइल देखील थर्ड-पार्टी वेबसाइटवर पोस्ट एम्बेड केल्याप्रमाणे एम्बेड केले जाऊ शकते.

क्रिएटर्सची सशुल्क सदस्यता (Paid Subscriptions For Followers)

अलीकडे, इंस्टाग्रामने यूएसमध्ये सशुल्क सदस्यता देण्याचे फीचरची टेस्टींग सुरू केली आहे. यामध्ये, वापरकर्ते एक्सक्लूझीव्ह कंटेट आणि स्टोरीजसाछी त्यांच्या आवडत्या क्रिएटर्ससाठी पेड सबस्क्रिप्शन घेऊ शकतात. हे लवकरच इतर देशांमध्ये आणले जाईल.

reels

लवकरच Instagram रील्ससाठी 90-सेकंद व्हिडिओ वेळ मर्यादा लॉंच केली जाऊ शकते. सध्या, रिल्ससाठी केवळ 15 सेकंद, 30 सेकंद किंवा 60 सेकंदांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा ऑप्शन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT