Instagram Reels Addiction : आजकाल सोशल मीडिया वापरत नाही अशी व्यक्ती अगदी दुर्मिळ झाली आहे. इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्स या लहान व्हिडिओ फॉरमॅटला जगभरात पसंत केलं जात आहे. तुम्ही जर रील्स पाहत असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल की हे व्हिडिओ पाहता पाहता वेळ कसा जातो ते कळतच नाही. एकापाठोपाठ एक रील्स आपल्या समोर येत जातात आणि मग फोन खाली ठेवणं अवघड होऊन जातं. मात्र हे कशामुळे होतं?
जगभरातील कित्येक लोकांनी हे मान्य केलं आहे, की त्यांनी एकदा इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब उघडलं तर ते पटकन बंद करू वाटत नाही. एक रील संपल्यानंतर लगेच दुसरा असा रील समोर येतो, जो यूजरला आवडू शकेल. त्यामुळेच कित्येक तास यूजर्स हे रील्स किंवा शॉर्ट्स पाहत राहतात. कित्येकांनी तर हे व्यसनाप्रमाणे असल्याचंही म्हटलं आहे.
तुम्हाला जाणवलं असेल, की इन्स्टाग्रामवर कित्येक वेळा असेच रील्स येतात जे तुम्हाला आवडतील. यासाठी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं वेगळं असं अल्गोरिदम असतं. हे अल्गोरिदमच ठरवतं की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये दिसतील. हे अल्गोरिदम नेमकं कसं काम करतं? जाणून घेऊया. (How does Algorithm work)
आपलं अल्गोरिदम (Insta Reels Algorithm) हे काही एका दिवसात तयार होत नाही. एखादं अॅप तुम्ही जेव्हापासून वापरत आहात, तेव्हापासून ते अल्गोरिदम तयार करण्यासाठी डेटा गोळा करत असतं. अल्गोरिदम सेट होण्यासाठी यूजरचा पुढील डेटा पाहिला जातो -
लाईक किंवा शेअर केलेले व्हिडिओ
फेव्हरेट लिस्टमध्ये अॅड केलेले व्हिडिओ
नॉट इंटरेस्टेड किंवा इंटरेस्टेड मार्क केलेले व्हिडिओ.
सर्च पॅटर्न
फॉलो केलेले अकाउंट्स
यूजरच्या पोस्ट
रिपोर्ट केलेले व्हिडिओ
पूर्ण पाहिलेले वा स्किप केलेले व्हिडिओ
या गोष्टींवरुन अल्गोरिदम ठरवतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचा कंटेंट पहायला आवडू शकतो. यानुसार ते तुमच्या फीडमध्ये नवनवीन व्हिडिओ सजेस्ट करत राहतं. अर्थात, यामध्ये कधी कधी प्रमोटेड कंटेंट देखील दिसू शकतो. (YouTube Shorts Algorithm)
तुमच्या डिव्हाईसची लोकेशन, तुमच्या अकाउंटची सेटिंग या गोष्टींवर देखील तुम्हाला कोणते व्हिडिओ दिसतील हे ठरतं. म्हणजेच, तुम्ही जर भारतात इन्स्टाग्राम वापरत असाल, तर तुम्हाला अधिकाधिक भारतीय कंटेंट दिसण्याची शक्यता आहे. तसंच अकाउंट उघडताना तुम्ही आवडत्या कॅटेगरीमध्ये ज्या गोष्टी सिलेक्ट केल्या आहेत, त्याबाबतचे व्हिडिओ तुम्हाला प्राधान्याने दिसतील.
इन्स्टाग्राम रील्स किंवा यूट्यूब शॉर्ट्स हे प्रत्येक यूजरच्या आवडी-निवडीनुसार त्याला दिसत जातात. तसंच हे व्हिडिओ अगदी 15 सेकंद किंवा 30 सेकंदांचे असतात. यामुळे स्क्रोल करत करत आपण किती व्हिडिओ पाहिले याचा अंदाजच लागत नाही. यामुळेच हे एखाद्या व्यसनाप्रमाणे असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.