Instagram Spam Messages eSakal
विज्ञान-तंत्र

Instagram Spam Messages : इन्स्टाग्रामवर येणाऱ्या स्पॅम मेसेजना बसणार आळा! कंपनी आणतेय नवीन फीचर्स

Sudesh

तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल, तर त्यावर येणाऱ्या स्पॅम मेसेजेसने नक्कीच वैतागला असाल. विशेषतः महिलांना तर अनोळखी व्यक्तींकडून भरमसाठ नकोसे मेसेजेस येत राहतात. इन्स्टाग्रामवर कोणतीही व्यक्ती कोणालाही मेसेज करू शकते. यामुळे अशा नकोशा मेसेजना आळा घालणं कठीण होतं. मात्र आता मेटा यासाठी नवीन फीचर्स आणणार आहे.

स्पॅम मेसेजना आळा घालण्यासाठी इन्स्टाग्राममध्ये दोन नवीन फीचर्स अ‍ॅड करणार आहे. यामुळे आता नॉन-फॉलोवर्सच्या मेसेजवर निर्बंध लागू होणार आहेत. या फीचर्सवर कंपनीने जूनपासून काम सुरू केलं होतं. आता हे फीचर्स अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याचं समोर आलं आहे.

नॉन-फॉलोवर्सना निर्बंध

या फीचरमुळे एखादी व्यक्ती जर तुम्हाला फॉलो करत नसेल, तर ती व्यक्ती तुम्हाला दिवसाला केवळ एकच मेसेज रिक्वेस्ट पाठवू शकेल. त्यातही, ही व्यक्ती तुम्हाला केवळ टेक्स्ट स्वरुपात मेसेज करू शकेल. यामुळे नकोशा असणाऱ्या भरमसाठ मेसेजेसपासून सुटका मिळणार आहे.

मेटामधील महिला सुरक्षा विभागाच्या प्रमुख सिंडी साउथवर्थ यांनी एका ई-मेलमधून या फीचरबाबत माहिती दिली. "आपला इनबॉक्स उघडताना यूजर्सना भीती नाही, तर आत्मविश्वास वाटायला हवा. तसंच आपला इनबॉक्स आपल्या नियंत्रणात असल्याची जाणीव त्यांना हवी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. इन्स्टाग्राममध्ये आधीपासूनच काही स्पॅम विरोधी फीचर्स उपलब्ध आहेत. आता नवीन फीचर्समुळे यूजर्सना आणखी सुरक्षा मिळेल." असं त्या म्हणाल्या.

इन्स्टाग्रामध्ये कोणते फीचर्स उपलब्ध

सध्या इन्स्टाग्राममध्ये तुम्हाला नॉन-फॉलोवर्स व्यक्तींकडून आलेले मेसेज थेट समोर न दिसता वेगळ्या सेक्शनमध्ये दिसतात. तसंच, 'हिडन वर्ड्स' ही सेटिंग सुरू केल्यास आक्षेपार्ह शब्द, वाक्य किंवा इमोजी आपोआप एका छुप्या फोल्डरमध्ये जातात. यामुळे अशा प्रकारचे मेसेज देखील तुम्हाला समोर दिसत नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: मुंबईहून पुण्याला आता दीड तासांत जाता येणार! गडकरींनी दिली नव्या हायवेची माहिती

IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

Nitin Gadkari : सरकारने कंपन्या चालवल्यामुळे मुलभूत प्रश्नच सुटले नाहीत; पुण्यात नितीन गडकरींचं विधान

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद पाडू म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीचे जोरदार आंदोलन

IT Act Amendment: मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका! IT कायद्यातील घटनादुरुस्ती रद्द करण्याचे आदेश; युट्यूब, फेसबुक, ट्विटरला दिलासा

SCROLL FOR NEXT