instagram update location sharing nicknames 300 stickers esakal
विज्ञान-तंत्र

Instagram New Feature : इंस्टाग्राममध्ये 3 धमाकेदार फीचर्सची एंट्री! पटकन बघून घ्या नवं अपडेट

Instagram roll out location sharing nicknames 300 stickers : इंस्टाग्राममध्ये तीन नवीन फिचर्स आले आहेत. हे तुम्हाला खुश करतील.

Saisimran Ghashi

Instagram Update New Feature : इंस्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी डायरेक्ट मेसेजिंग (DM) प्रणाली आणखी आकर्षक आणि उपयुक्त बनवण्यासाठी तीन नवीन फिचर्स आणले आहेत. या अपडेटमुळे चॅटिंगचा अनुभव अधिक मजेशीर आणि वैयक्तिक होणार आहे.

लाईव्ह लोकेशन शेअरिंग

इंस्टाग्रामने लाईव्ह लोकेशन शेअरिंगची सुविधा आणली आहे. यामुळे युजर्स मित्रांसोबत लोकेशन शेअर करू शकतात. कोणत्याही इव्हेंट, कार्यक्रम किंवा गजबजलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

  • युजर्स एक तासासाठी लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात.

  • लोकेशन शेअर करताना फक्त संबंधित चॅटमधील व्यक्तींनाच ती माहिती दिसणार आहे.

  • चॅटवर एक नोटिफिकेशन दिसेल, ज्यामुळे युजर्सला लोकेशन शेअरिंग सुरू असल्याचं लक्षात राहील.

  • ही सुविधा सध्या काही निवडक देशांमध्ये उपलब्ध असून, भविष्यात इतर देशांमध्येही लवकरच पोहोचणार आहे.

निकनेम्सचा पर्याय

इंस्टाग्रामने आता चॅटिंगला अधिक वैयक्तिक करण्यासाठी निकनेम्सचा पर्याय दिला आहे. युजर्स आता आपल्या मित्रांसाठी मजेशीर किंवा वैयक्तिक टोपणनावे ठेवू शकतात.

चॅटच्या टॉपवर “Nicknames” पर्याय निवडून मित्रांसाठी निकनेम सेट करता येईल. हे निकनेम्स फक्त DM चॅटमध्ये दिसतील आणि इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्याचा परिणाम होणार नाही. कोणत्याही वेळी निकनेम्स बदलता येतील आणि चॅटमध्ये कोण बदल करू शकतो हे देखील ठरवता येईल.

३०० हून अधिक नवीन स्टिकर्स

युजर्ससाठी इंस्टाग्रामने १७ नवीन स्टिकर पॅक्स आणले आहेत. यामध्ये ३०० हून अधिक मजेशीर स्टिकर्स आहेत. मित्रांसोबत शेअर केलेले स्टिकर्स सेव्ह करून पुन्हा वापरता येणार आहेत. हे स्टिकर्स चॅटिंग अधिक मजेशीर आणि सर्जनशील बनवतील.

ही फिचर्स इंस्टाग्रामने त्याच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅप्स जसे की Snapchat यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आणली आहेत. लाईव्ह लोकेशन शेअरिंग, वैयक्तिक टच देणारे निकनेम्स, आणि स्टिकर्समुळे इंस्टाग्राम युजर्ससाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT