Internet in India Report 2023 eSakal
विज्ञान-तंत्र

Internet in India : भारतात 80 कोटी इंटरनेट यूजर्स, ग्रामीण भागातील संख्या वाढली.. 86 टक्के लोक करतात केवळ टाईमपास - रिपोर्ट

India OTT Users : ओटीटी पाहणाऱ्या यूजर्सपैकी 57 टक्के लोक आपल्या स्थानिक भाषेतील कंटेंट पाहत असल्याचंही या अहवालात समोर आलं आहे.

Sudesh

Internet In India report 2023 : इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) आणि Kantar या संस्थेने मिळून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. इंटरनेट इन इंडिया 2023 या रिपोर्टमध्ये देशातील इंटरनेट यूजर्सबाबत माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे, की देशातील 80.2 कोटी लोक हे दररोज इंटरनेट अ‍ॅक्सेस करतात.

एकूण इंटरनेट यूजर्सपैकी तब्बल 70.7 कोटी लोक हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आणि ऑडिओ पाहण्यासाठी इंटरनेट वापरतात असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट स्पीकर्स, फायरस्टिक, क्रोमकास्ट आणि ब्लू रे अशा गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर केला जातो असं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. ओटीटी पाहणाऱ्या यूजर्सपैकी 57 टक्के लोक आपल्या स्थानिक भाषेतील कंटेंट पाहत असल्याचंही या अहवालात समोर आलं आहे.

इंटरनेट यूजर्सची संख्या वाढली

गेल्या दोन वर्षांमध्ये भारतातील इंटरनेट यूजर्सची संख्या 58 टक्क्यांनी वाढली आहे. इंटरनेटवर 70.7 कोटी लोक ओटीटी अ‍ॅक्सेस करतात. 61 कोटी लोक ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगसाठी इंटरनेट वापरतात. 43.8 कोटी लोक हे ऑनलाईन गेमिंगसाठी इंटरनेट वापरतात. 42.7 कोटी लोक नेट कॉमर्ससाठी, 37 कोटी लोक डिजिटल पेमेंटसाठी आणि 2.4 कोटी लोक ऑनलाईन लर्निंगसाठी इंटरनेटचा वापर करतात असं या अहवालात सांगितलं आहे.

बातम्यांसाठी मुख्य सोर्स

सध्या लोकांना बातम्यांसाठीचा मुख्य सोर्स हा इंटरनेट असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. न्यूज अ‍ॅप्स, वेबसाईट, सोशल मीडिया पोस्ट आणि यूट्यूब अशा प्लॅटफॉर्मवरुन यूजर्स बातम्या पाहतात. एकूण इंटरनेट यूजर्सपैकी 53.4 कोटी लोक हे बातम्यांसाठी इंटरनेटचा वापर करतात. यामध्ये 20.5 कोटी लोक हे जागरुकपणे न्यूज अ‍ॅक्सेस करतात असंही या अहवालात स्पष्ट केलंय.

ग्रामीण भागातील यूजर्स वाढले

देशातील एकूण इंटरनेट यूजर्सपैकी 44.2 कोटी लोक हे ग्रामीण भागातील असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. एकूण इंटरनेट यूजर्सच्या तुलनेत ही संख्या 53 टक्के, म्हणजेच निम्म्याहून अधिक आहे. यासोबतच महिलांचं इंटरनेट वापरण्याचं प्रमाणही वाढलं असल्याचं समोर आलंय. 2015 साली 71 टक्के पुरूष आणि 29 टक्के महिला इंटरनेट यूजर्स होते. तर 2023 मध्ये हे 54 टक्के पुरूष तर 46 टक्के महिला यूजर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT