doorstep iphone 16 delivery within 20 minutes esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Saisimran Ghashi

iPhone Doorstep Delivery : आयफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज iPhone 16 चा सेल सुरू झाला आहे. आयफोन खरेदी करण्यासाठी सकाळपासून मुंबई आणि दिल्लीच्या स्टोअरवर खूप गर्दी आहे. आता तुम्हाला लांबच्या लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कारण BigBasket, Blinkit आणि Zepto या तुमच्या आवडत्या ऑनलाइन ग्रोसरी शॉपिंग अॅप्स आता फक्त 20 मिनिटांत तुमच्या घरापर्यंत आयफोन 16 पोहोचवून देणार आहेत. या फास्ट-डिलिव्हरी कंपन्या आता फक्त किराणा मालच नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञानही तुमच्या दारापर्यंत पोहोचवून देणार आहेत.

आज iPhone 16 ची पहिली अधिकृत विक्री झाली. जगभरातील Apple स्टोर्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. काही उत्साही चाहते, दूरच्या ठिकाणांहून प्रवास करून, नवीनतम iPhone सर्वात आधी मिळवण्यासाठी आतुर आहेत. पण फोन घेण्यासाठी तुम्हालाही रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज नाही. फक्त BigBasket, Blinkit किंवा Zepto अॅप डाउनलोड करा आणि 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात iPhone 16 तुमच्या घरी पोहोचवेल.

बेंगलोरच्या कोरमंगला येथील एका ग्राहकाने सकाळी ८ वाजता ऑनलाइन ऑर्डर केली आणि ८:०७ वाजता त्यांच्या हातात चमचमता नवीन iPhone 16 होता.

ही गोष्ट दर्शवते आहे की, डिलिव्हरीच्या जगात किती वेगाने बदल होत आहेत. Blinkit आणि Zepto सारख्या कंपन्या आता तुमच्या आवडत्या उत्पादनांची रिकॉर्ड वेगात तुमच्या दारापर्यंत पोहोच करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. ही सोय एकदम बेस्ट आहे. आता लांबीच्या रांगेत उभे राहण्याची किंवा नवीनतम आयफोन मिळवण्यासाठी दिवसभर वाट पाहण्याची गरज नाही.

Blinkitकडे सध्या iPhone 16 आणि iPhone 16 Plus उपलब्ध आहेत. मात्र फक्त 128GB व्हेरियंट खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्यासोबतच, ICICI बँक, कोटक महिंद्रा आणि SBI क्रेडिट कार्ड असल्यास Blinkit iPhone 16 आणि iPhone 16 Plus वर रु.5000 चा कॅशबॅक देत आहे. Pro मॉडेल्स खरेदी करायचे असल्यास तुम्हाला स्टोअरवर जावे लागेल कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Pro मॉडेल्सची डिलिव्हरी करत नाहीत. तसेच, जास्त स्टोरेज असलेले व्हेरियंट्स देखील सध्या BigBasket, Blinkit आणि Zepto वर उपलब्ध नाहीत. ते पुढच्या आठवड्यात प्रो मॉडेल्सची डिलिव्हरी करतील का हे अद्याप अस्पष्ट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT