iPhone 16 Launch Features : Apple ने आज iPhone 16 लाँच केला आहे. टेक प्रेमी या सीरिजच्या प्रतीक्षेत होते. iPhone 16 मधील Apple Intelligence या अत्याधुनिक बुद्धिमत्तेमुळे तुमचा iPhone अनुभव आणखी सुधारित आणि उपयुक्त होणार आहे. Apple चे सीईओ टिम कुक यांच्या म्हणण्यानुसार, iPhone 16 चे नवीन जनरेशन ही Apple Intelligence ची पायाभरणी आहे आणि एक रोमांचक टेक्नॉलजी युगाची सुरुवात आहे.
Apple Intelligence: हा या नवीन iPhone चा मुख्य आकर्षण आहे. Apple Intelligence तुमच्या फोनमध्येच शक्तिशाली जनरेटिव्ह मॉडेल्स उपलब्ध करून देते. तुमच्या आवश्यकतेनुसार ते तुमच्यासाठी मजकूर, प्रतिमा आणि अगदी व्हिडिओही तयार करतील.
डिझाईन आणि रंग: iPhone 16 ला आपल्याला आधीपासूनच परिचित असलेले कॅमेरा लेन्स डिझाईन मिळाले आहे. यामुळे 3D व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य होते. रंगांमध्ये काळा, पांढरा यांच्यासोबत आता नळे निळा, हिरवा आणि गुलाबी हे नवीन पर्याय उपलब्ध आहेत.
मोठा आणि स्ट्रॉंग डिस्प्ले: iPhone 16 ला 50% अधिक मजबूत असलेले नवीन सिरेमिक शील्ड मटेरियल डिस्प्लेसाठी वापरण्यात आले आहे. स्क्रीन आकार मात्र जुन्यासारखाच आहे. iPhone 16 साठी 6.1 इंच आणि iPhone 16 Plus साठी 6.7 इंच.
नवीन कॅमेरा कंट्रोल बटन: आधी चर्चा होत असलेला कॅप्चर बटन आता कॅमेरा कंट्रोल म्हणून ओळखला जाईल. याचा वापर करून तुम्ही तुमची बोटं फिरवून कॅमेरा सेटिंग्ज अॅडजस्ट करू शकता.
अत्याधुनिक A18 चिपमुळे iPhone 16 ची कार्यक्षमता आणखी वाढली आहे. 16-कोर न्यूरल इंजिन हे मशीन लर्निंगसाठी iPhone 15 पेक्षा 2 पट वेगवान आहे. याशिवाय, 17% अधिक सिस्टिम मेमरी बँडविड्थ मिळते.
iPhone 16 चा GPU iPhone 15 पेक्षा 40% वेगवान आणि 35% अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे.
Apple Intelligence तुमच्या डेटाची गोपनीयता राखते यावर भर देतो. तुमचा डेटा तुमच्याच फोनवर राहतो आणि गुप्त असतो. iPhone 16 सोबतच अनेक रोमांचक AI-आधारित फीचर्स येत आहेत. मजकूर निर्मिती, प्रतिमा निर्मिती, नैसर्गिक भाषा शोध, मेल सारांश आणि बरेच काही या स्मार्टफोनमध्ये मिळणार आहे.
iPhone 16 Pro ला 6.3 इंच आणि iPhone 16 Pro Max ला 6.9 इंचा डिस्प्ले मिळतो आहे. बेझेल आकार कमी झाल्यामुळे फोनचा आकार वाढलेला नाही. काळा, पांढरा, नैसर्गिक आणि डेजर्ट या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
iPhone 16 Pro मध्ये आतापर्यंतच्या सर्व iPhone पेक्षा सर्वात मोठी बॅटरी आहे.
A18 Pro मध्ये 16 कोर न्यूरल इंजिन, 17% अधिक मेमरी बँडविड्थ आणि 6 कोर GPU आहे. रे-ट्रेसिंग iPhone 15 Pro पेक्षा 2 पट वेगवान आहे. CPU 15% वेगवान आणि 20% अधिक ऊर्जा कार्यक्षम आहे.
iPhone 16 Pro ला नवीन 48MP फ्यूजन कॅमेरा मिळतो आहे. अल्ट्रावाइड कॅमेरा देखील 48MP चा आहे. सर्व प्रो मॉडेल्सना 12MP टेलीफोटो लेन्स 5x झूमसह मिळतो.
नवे फोटोग्राफिक स्टाइल्स या फीचरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लोकांच्या फोटोमधील रंग, हायलाइट्स आणि सावली अॅडजस्ट करू शकता.व्हिडिओ फीचर्स 4K 120 fps व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रभावी स्लो-मोशन इफेक्ट्स आहेत.
iPhone 16 Pro ची सुरुवाती किंमत $999 (₹81,000) पासून सुरू असू शकते आणि iPhone 16 Pro Max ची किंमत $1199 (₹97,000) पासून सुरू असू शकते. प्री-ऑर्डर सुरु झाले आहेत आणि फोन 20 सप्टेंबरला रिलीज होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.