iPhone 16 Series Launch : आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वाधिक प्रतीक्षित आयफोन 16 सीरीज लॉन्चची तारीख जवळ येत आहे. अनेक लीक आणि रिपोर्टच्या अंदाजांवरून या नवीन आयफोनमध्ये कोणत्या नव्या फीचर्सची अपेक्षा करता येईल,हे जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
एका अहवालानुसार, अॅपल १० सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात आपली नवीन आयफोन 16 सीरीज लाँच करण्याची शक्यता आहे. प्री-ऑर्डर लवकरच सुरू होऊ शकतात आणि फोन 20 सप्टेंबरपर्यंत दुकानांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम अॅपलच्या अधिकृत वेबसाइट आणि यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह-स्ट्रीम केला जाण्याची शक्यता आहे.
आयफोन 16 ची डिझाईन आयफोन 15 सारखीच राहील अशी शक्यता आहे पण काही सुधार अपेक्षित आहेत. प्रो मॉडेल्समध्ये मोठे डिस्प्ले असतील अशी अटकळ आहे. iPhone 16 Pro मध्ये 6.3 इंच आणि iPhone 16 Pro Max मध्ये 6.9 इंच डिस्प्ले असू शकते.
कॅमेराची गुणवत्ता वाढवणारे काही फीचर्स येण्याची शक्यता आहे. सर्व मॉडेल्समध्ये फोटोग्राफीचा अनुभव सुधारण्यासाठी नवीन कॅप्चर बटन असेल. तसेच, iPhone 15 Pro मध्ये आलेला अॅक्शन बटन आता स्टँडर्ड iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये म्युट स्विचच्या जागी येऊ शकतो.
iPhone 16 सीरीजमध्ये अॅपलचा नवीन A18 चिप असण्याची शक्यता आहे. या चिपमुळे फोनची कार्यक्षमता वाढणार आहे. AI संबंधित फीचर्सनाही अधिक गती मिळणार आहे.
iPhone 16 मध्ये 8 GB रॅम असण्याची शक्यता आहे. यामुळे मल्टीटास्किंग आणि फोनची रिस्पॉन्सिव्हनेस वाढेल.
iPhone 16 Pro आणि Pro Max मध्ये नवीन टायटॅनिअम ब्रॉन्झ रंग येण्याची शक्यता आहे.
अशाप्रकारे अनेक अपेक्षित फीचर्ससह iPhone 16 सीरीज लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. अधिकृत घोषणा आणि किंमत जाणून घेण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.