Apple to Discontinue iPhone 13, 14, and More esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 16 लाँचला 2 दिवस बाकी; तोवर धक्कादायक बातमी समोर..ॲपलच्या 'या' 4 सीरिज होणार बंद,फोनच्या सिक्युरिटीवर गंभीर परिणाम

Saisimran Ghashi

iPhone 16 Launch : आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ९ सप्टेंबरला नवीन iPhone 16 सीरीजच्या लाँचसोबतच Apple कंपनी अनेक जुने iPhone बंद करण्याच्या तयारीत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या फोनवर येणाऱ्या अपडेट्स आणि सिक्युरिटीवर होऊ शकतो.

ॲपल ग्लोटाइम इव्हेंट

ॲपल ९ सप्टेंबर रोजी त्यांची बहुचर्चित ग्लोटाइम इव्हेंट घेऊन येत आहे. या इव्हेंटमध्ये ते नवीन iPhone 16 सीरिज लाँच करणार आहेत. या सीरिजमध्ये iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max असे 4 मॉडेल्स येण्याची शक्यता आहे. फक्त फोनच नाही तर यासोबतच AirPods 4, Apple Watch SE 3, Apple Watch Ultra 3, Apple Watch Series 10 आणि iPad Mini 7 देखील लाँच होण्याची शक्यता आहे.

जुन्या वापरकर्ते सावध रहा

ॲपलची जुने मॉडेल्स बंद करण्याची परंपरा आहे. जर तुम्ही ३-४ वर्ष जुने iPhone वापरत असाल तर सावध रहा. तुमचे मॉडेल बंद होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ॲपल तुमच्या फोनवर सॉफ्टवेअर किंवा सिक्योरिटी अपडेट्स पाठवणार नाही. त्यामुळे तुमच्या डाटावर हल्ला होण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच, कोणते मॉडेल्स बंद होऊ शकतात याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

कोणते iPhone बंद होणार?

  • iPhone 13 सीरिज

  • iPhone 14 सीरिज

  • iPhone 15 Pro

  • iPhone SE

जुन्या फोनवर डिस्काउंट

ही बातमी वाईट वाटली तरी ॲपलच्या फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधीही आहे. iPhone 16 सीरिज लाँच झाल्यानंतर iPhone 14 वर मोठा डिस्काउंट मिळू शकतात. त्यामुळे ९ सप्टेंबरनंतर डिस्काउंटवर नजर ठेवा आणि त्याचबरोबर तुमच्या डाटाची सुरक्षा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT