iqoo z6 5g launched with 5000mah battery 50mp camera check price in India and specifications here  
विज्ञान-तंत्र

50MP कॅमेरासह iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

सकाळ डिजिटल टीम

iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. कंपनीच्या Z सीरीजमध्ये सादर करण्यात आलेला हा एक नवीन स्मार्टफोन असून तो 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येते. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर चालतो. iQoo Z6 5G मध्ये 8GB पर्यंत RAM आहे. तर फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून सुपर नाईट मोड, बोकेह मोडसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. थर्मल मॅनेजमेंटसाठी डिव्हाइस पाच-लेयर कुलिंग सिस्टिमने सुसज्ज आहे. iQoo Z6 5G ची स्पर्धा Redmi Note 11 Pro+ 5G, Vivo T1 5G आणि Samsung Galaxy A52 सारख्या स्मार्टफोनशी होईल.

iQoo Z6 5G ची भारतात किंमत आणि लाँच ऑफर

भारतात iQoo Z6 5G ची किंमत 4GB रॅम व्हेरिएंटसाठी 15,999 रुपयांपासून सुरू होते. हे 6GB रॅम मॉडेलमध्ये देखील आणले गेले आहे, ज्याची किंमत 16,999 रुपये आहे. 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. iQoo Z6 5G क्रोमॅटिक ब्लू आणि डायनॅमो ब्लॅक रंगांमध्ये आणण्यात आला आहे. 22 मार्चपासून ते Amazon आणि iQoo इंडियाच्या ई-स्टोअरवरून खरेदी करता येईल.

HDFC बँक कार्ड किंवा EMI व्यवहाराद्वारे iQoo Z6 5G खरेदी केल्यावर, ग्राहकांना 2,000 रुपयांची इंस्टंट सूट मिळेल. हे नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज डिस्काउंटसह देखील देण्यात आला आहे.

iQoo Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स

ड्युअल-सिम (नॅनो) स्लॉटसह iQoo Z6 5G स्मार्टफोन Funtouch OS 12 लेयर Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.58-इंचाचा फुल-एचडी+ (1,080x2,408 पिक्सेल) डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला 8GB पर्यंत LPDDR4X रॅमचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये मुख्य लेन्स 50 मेगापिक्सेल आहे, ज्यामध्ये Samsung ISOCELL JN1 सेन्सर आहे. याशिवाय 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे. तथापि, Bokeh कॅमेरा 4GB व्हेरिएंटमध्ये दिलेला नाही.

iQoo Z6 5G मध्ये 16-मेगापिक्सेलचा Samsung 3P9 सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज आहे, जे SD कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते.

कनेक्टिव्हिटी पर्यायांच्या बाबतीत, iQoo Z6 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅकसाठी सपोर्ट दिला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे वजन 187 ग्रॅम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT