CNG V/s LPG Esakal
विज्ञान-तंत्र

Car साठी नक्की काय योग्य? CNG की LPG

CNG आणि LPG या दोघांमध्ये काय अंतर आहे? कोणता पर्याय वापरल्याने जास्त मायलेज मिळतं? किमतीत किती फरक आहे ? शिवाय LPG वापरणं कारसाठी नुकसानदायी तर नाही ना या सगळ्याची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत

सकाळ डिजिटल टीम

ऑटो मार्केटमध्ये सध्या CNG गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. यामुळेच अनेक ऑटो मोबाईल कंपन्यादेखील CNG म़ॉडेलवर भर देऊ लागल्या आहेत . पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण CNG कारकडे वळू लागले आहेत. कमी किमतीत चांगलं मायलेज मिळत असल्याने अनेकजण गाड्यांमध्ये सीएनजी CNG बसवून घेत आहेत. तर आता काही तर CNG ऐवजी एलपीजी LPG वर गाड्या चालवू लागले आहेत. होय LPG वरही गाड्या चालवणाऱ्यांचं प्रमाण आता वाढू लागलंय. Is it advisable and Safe to run CNG Car or LPG

CNG आणि LPG या दोघांमध्ये काय अंतर आहे? कोणता पर्याय वापरल्याने जास्त मायलेज मिळतं? किमतीत किती फरक आहे ? शिवाय LPG वापरणं कारसाठी नुकसानदायी तर नाही ना या सगळ्याची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. Diffrence Between CNG and LPG Gas

CNG आणि LPG ची किंमत

सध्याच्या घडीला घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ही जवळपास ११०० रुपये इतकी आहे. म्हणजेच प्रिती किलो जवळपास ७८ रुपये. तर CNG गॅसची किंमत ८० रुपये प्रति किलो आहे. ही किंमत प्रत्येक राज्यात थोडीफार वेगळी आहे. म्हणजेच दोन्हीच्या किमती या जवळपास सारख्याच आहेत.

CNG आणि LPG कार मायलेज किती देत

CNG सिलेंडरची क्षमता ही १० किलो इतकी असते. मात्र, जास्त दबाव निर्माण होवू नये म्हणून बऱ्याचदा केवळ ९ किलो गॅस यात भरला जातो. मायलेजचं म्हणायचं झालं तर प्रत्येक कारचा मायलेज वेगवेगळं असतं. मात्र जर मारुती सेलेरिओचं उदाहरण पाहिलं तर या गाजीचं CNG मॉडल 35Km/Kg मायलेज देतं. म्हणजेच सिलेंडरमध्ये ९ किलो सीएनजी असल्यास गाडी ३१५ किलो मीटर प्रवास करू शकते.

तर LPG सिलेंडरचं म्हणायचं झालं तर तो १४.२ किलोचा असतो. काहीजण घरगुती सिलेंडर गाडीत फिक्स करतात. पैशांचा विचार करायचा झाल्यास दोन्ही एकसारखेच आहेत. फक्त घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्यास जास्त क्षमतेचा सिलेंडर उपलब्ध झाल्याने वरील ४ किलो गॅसमुळे थांबा न घेता जास्त किलो मीटरचा पल्ला गाठणं शक्य होतं. CNG gas car mileage

कारसाठी LPG सिलेंडर वापरणं सुरक्षित आहे का?

कारसाठी LPG सिलेंडरचा वापर करणं सुरक्षित नाही. कारमध्ये LPG सिलेंडरचा ब्लास्ट झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यासाठीच कार कंपन्या देखील CNG सिलेंडरचा पर्याय देतात. शिवाय घरगुती गॅस सिलेंडरमध्ये सल्फर असल्याने अधिक प्रदूषण होतं. सिलेंडरमध्ये असलेल्या अतिरिक्त गॅसमुळे गाडीच्या इंजनचं लाइफ २५ टक्क्यांनी कमी होतं. परिणामी कारचं इंजिन लवकर खराब होवू शकतं.

कोणता पर्याय अधिक योग्य? 

ऑक्टो क्षेत्रातातील अनेक तज्ञ गाडीसाठी LPG योग्य नसल्याचा सल्ला देतात. LPGमुळे कारचं अधिक नुकसान होतं. शिवाय कारला आग लागण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे CNG हा अधिक योग्य पर्याय आहे. यातही कंपनी फिटेड CNG कार घेणं कधीही योग्य गाडी खरेदी केल्यानंतर इतर ठिकाणाहून टँक बसवणं धोकादायक ठरू शकतं. CNG गॅसमुळे प्रदूषणही कमी होतं.

LPG म्हणजे नेमकं काय?

LPG म्हणजेच लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस. हा अनेक गॅसच्या मिश्रणातून तयार केला जातो. हा नैसर्गिक गॅसचा अलटरनेट आहे.

CNG म्हणजे काय ?

CNG म्हणजेच कंप्रेस्ड नैच्युरल गॅस. नैसर्गिक गॅसला काँप्रेस करून हा तयार केला जातो. इतर इंधनाच्या तुलनेच हा गॅस स्वस्त असतो.

काल चालवत असताना इंधनाचा खर्च टाळण्यासाठी इतर पर्याय वापरण्यापूर्वी सुरक्षिततेचा विचार करणं सर्व प्रथम गरजेचं आहे. त्याशिवाय कारचं नुकसान होणार याचा देखील विचार करायला हवा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT