earth day jayant narlikar sakal
विज्ञान-तंत्र

Maharashtra Din : मानव पृथ्वीऐवजी दुसऱ्या ग्रहावर स्थायिक होऊ शकतो का ? जयंत नारळीकर यांनी दिलं उत्तर

आपण मंगळावर गेलो तरी श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये कोण रूपांतर करणार, असा प्रश्न नारळीकर यांनी उपस्थित केला होता.

नमिता धुरी

मुंबई : पृथ्वीवरची जागा अपुरी पडत असून माणूस आता इतर ग्रहांवर आपली वस्ती वसवण्याची स्वप्नं बघत आहे. अगदी चंद्रावर जमीन खरेदी करण्यापर्यंत माणसाची मजल गेली आहे.

पण खरंच पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर स्थायिक होणे शक्य आहे का ? या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांनी एक कार्यक्रमात दिले होते. (Is it possible for human being to live on another planet jayant naralikar explains earth day )

सजीवांना जगण्यासाठी पृथ्वीसारखे वातावरण आणि संसाधने दुसऱ्या ग्रहावर मिळणे सध्या तरी अवघड आहे. त्यामुळे पृथ्वीला सहज सोडणे सोपे जाणार नाही. आपण मंगळावर गेलो तरी श्वासातून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिजनमध्ये कोण रूपांतर करणार, असा प्रश्न नारळीकर यांनी उपस्थित केला होता. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सध्या तरी मानवी वस्तीसाठी पृथ्वीइतका योग्य दुसरा ग्रह नाही. जर तुमचे काही आर्थिक हितसंबंध असतील किंवा काही संसाधने मिळवायची असतील तर दुसऱ्या ग्रहावर वस्ती करण्यास जाऊ शकतो, असे डॉ. जयंत नारळीकर यांनी सांगितले.

निदान पुढील शंभर वर्षे तरी माणसाला पृथ्वी सोडून दुसरीकडे वस्ती करण्यासाठी जाणे शक्य नाही. त्यामुळे पृथ्वीशीच मैत्रीपूर्ण संबंध ठेवत, तिचेच संवर्धन करणे गरजेचे आहे, असा सल्ला डॉ. मंगला नारळीकर यांनी दिला.

उच्च प्राथमिक वर्षापासूनच निश्चितच खगोलशास्त्र शिकवले जावे, असे मत डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. हे शिकवत असताना विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणिताचा सुरुवातीपासूनच आग्रह धरू नये, असे मत डॉ. मंगला नारळीकर यांनी व्यक्त केले.

विश्वनिर्मितीच्या महाविस्फोट (बिग बॅंग) सिद्धांताच्या विरुद्ध ‘स्थिर विश्वाचा सिद्धांत’ (स्टेडी स्टेट) मांडला जातो. डॉ. नारळीकरांचे गुरू प्रा. फ्रेड हॉएल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सिद्धांतासंबंधी संशोधन केले होते.

आजवर मिळालेले पुरावे हे महाविस्फोटाच्या सिद्धांताला पूरक आहेत. त्या तुलनेने स्थिर विश्वाच्या सिद्धांताबाबत कमी पुरावे मिळाले आहेत. यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. नारळीकर म्हणाले, ‘‘नवीन संशोधन करताना वैचारिक खुलेपणा स्वीकारायला हवा. १०० वर्षापूर्वीचे भौतिकशास्त्रातील सिद्धांत आणि आजचे सिद्धांत यात मोठा बदल झाला आहे.

विश्वाबद्दल अजूनही आपल्याला फार कमी माहीत आहे. कोणताही सिद्धांत नाकारणे सहज शक्य नाही. मात्र, त्याच्या समर्थनार्थ आपल्याला जास्त पुरावे गोळा करावे लागतील. बिग बँगची स्पष्टता देणाऱ्या ‘रेड शिफ्ट’ बद्दल पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण त्यासंबंधीही नवे संशोधने समोर येत आहे. निश्चितच नवे बदल आम्ही स्वीकारत आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT