Smartphone Tips  esakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Tips : फोन रात्रभर चार्ज करणे योग्य की अयोग्य?

चार्जिंग करताना हे लक्षात ठेवा

Pooja Karande-Kadam

Smartphone Tips : मोबाईल फोन हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. बहुतेक कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे. यामुळे काम खूप सोपे होते. बरेच लोक दिवसा फोन चार्ज करतात. तर बरेच लोक फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवतात आणि फोन चार्जिंगला लावून झोपी जातात. सकाळी उठले तर फोन चांगला चार्ज होईल, असे वाटते.

स्मार्टफोनमध्ये बॅटरी सर्वात महत्त्वाची असते. त्याशिवाय फोन काही नाही. बॅटरीशिवाय कॉल करणे तर दूरच. फोन सुरूही होऊ शकत नाही. आजकाल फोनची बॅटरी थोडी कमी झाली तर लोक लगेच चार्जिंगला लावतात. त्या लोकांचा असा विश्वास आहे की जर फोनची बॅटरी 100 टक्के असेल तर ती जास्त काळ टिकेल आणि कोणताही व्यत्यय येणार नाही.

काही लोक रात्रभर फोन चार्जिंगवरही सोडून देतात. यामुळे त्यांना सकाळी फोन पूर्ण चार्ज होतो. तुम्हाला माहितेय का, 100 टक्के फोन चार्ज झाल्यावर काय होते, चला तर मग याच प्रश्नाचे उत्तर आज आपण शोधून काढूया.

फोन रात्रभर चार्ज करणे हानिकारक आहे का?

फोन रात्रभर चार्जिंग करणं हानिकारक ठरू शकतं हे आपण सर्वांनी ऐकलं आहे आणि मान्यही केलं आहे. पण ते खरे आहे का? असे केल्याने बॅटरीवर वाईट परिणाम होतो. यामुळे बॅटरी लवकर संपते. पण ही गोष्ट खरी आहे की सगळेच सांगत आहेत याबद्दल आपण संभ्रमात राहतो.

Apple कंपनी काय म्हणते?

USA Today वर प्रकाशित झालेल्या एका अहवालात रात्रभर फोन चार्जिंगबद्दल उत्पादकांचे काय म्हणणे आहे ते तपशीलवार स्पष्ट केले आहे. अॅपलच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुमचा आयफोन बराच काळ पूर्ण चार्जवर असतो तेव्हा बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Samsung चे मत काय आहे

केवळ सॅमसंगच नाही, तर अँड्रॉइड फोनचे इतर अनेक निर्माते देखील हेच सांगत आहेत - तुमचा फोन चार्जरशी जोडलेला जास्त वेळ, विशेषतः रात्रभर सोडू नका. Huawei कडून काही सूचना येत आहेत, तुम्ही बॅटरीची पातळी 30% ते 70% च्या दरम्यान ठेवून तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता. (Mobile)

तुमची बॅटरी पूर्ण भरली की तुमचे चार्जिंग आपोआप थांबते. हे सर्वांना माहीत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की काहीवेळा जेव्हा बॅटरीची शून्यापर्यंत खाली येते, तेव्हा ती पुन्हा 100% चार्ज होण्यासाठी अधिक ऊर्जा आवश्यक असू शकते. हे चक्र तुमच्या बॅटरीचे आयुष्य कमी करते.

जुन्या मोबाईल फोनच्या बाबतीत असे नव्हते, परंतु आता स्मार्टफोनमध्ये असे चार्जिंग सर्किट आहे जे बॅटरी १००% चार्ज झाल्यानंतर पुरवठा थांबवते. स्मार्टफोनमध्ये सापडलेला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर इतका स्मार्ट आहे की, मोबाईलची बॅटरी पूर्ण भरल्यावर चार्ज होणे थांबते. यानंतर, बॅटरी ९०% पर्यंत पोहोचताच ती पुन्हा चार्ज होऊ लागते.

चार्जिंग करताना हे लक्षात ठेवा

ही एक नॉर्मल चूक आहे. आपल्यापैकी अनेक जण असे करतात. कोणत्याही थर्ड पार्टी चार्जरने फोनला चार्ज करणे खूप धोकादायक ठरू शकते. थर्ड पार्टी चार्जरमध्ये नेहमी त्या वस्तूत कमी असते. ज्या हँडसेटना जास्त गरज असते. त्यामुळे थर्ड पार्टी चार्जरने फोनला डॅमेज करू शकता.

तसेच फोनमध्ये शॉर्ट सर्किट होवू शकते. त्यामुळे कोणत्याही स्मार्टफोनला थर्ड पार्टी चार्जरने फोन चार्ज करणे टाळावे, आपल्या स्मार्टफोनचा ओरिजनल चार्जर सोबत ठेवावा. प्रवासात किंवा ऑफिसात चार्ज करताना ओरिजनल चार्जरचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे. (Charging Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT