Isaac Newton Birth Anniversary : जगप्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन आपल्या सर्वांनाच माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध, त्याचे तीन नियम आणि इतर बऱ्याच शोधांसाठी न्यूटन ओळखले जातात. 4 जानेवारी 1943 रोजी त्यांचा जन्म झाला होता. विज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेला हा वैज्ञानिक एकेकाळी जादूटोण्याच्या मार्गालाही लागला होता, हे तुम्हाला माहिती आहे का?
खोटं वाटत असलं, तरी हे अगदी खरंय. आपल्या आयुष्याचा एक मोठा काळ न्यूटनने धार्मिक पुस्तकं, जादूटोणा आणि अशाच गोष्टींच्या अभ्यासात (Isaac Newton Occult Studies) घालवला होता. याला कारण होतं, न्यूटनवर झालेली टीका. नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया.
आयझॅक न्यूटन हे लहानपणापासूनच अगदी संवेदनशील होते. त्यामुळे त्यांना जराही टीका किंवा निंदा सहन होत नव्हती. 1671 साली न्यूटन यांनी रॉयल सोसायटीसमोर एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. यामध्ये त्यांनी प्रकाश सात रंगांचा मिळून तयार होतो हा सिद्धांत सांगितला होता. मात्र, यावर सोसायटीमधील एक सदस्य रॉबर्ट हुक (Isaac Newton and Robert Hook) यांनी टीका केली.
या टीकेमुळे व्यथित होऊन न्यूटन यांनी स्वतःचा जगापासून संपर्क तोडला, आणि एकांतवासात गेले. त्यांनी स्वतःला चक्क एका खोलीत कोंडून घेतलं होतं. याचवेळी ते धार्मिक आणि जादूटोण्याच्या पुस्तकांकडे ओढले गेले.
न्यूटन हे या सगळ्यात एवढे गुरफटले की, त्यांनी चक्क परीसाचा शोध सुरू केला. परीस (Philosopher's stone) हा एक काल्पनिक दगड आहे, जो लोखंडाला लावताच त्याचं सोन्यात रुपांतर होतं. तसंच, परीसाचं पाणी प्यायल्यास ती पिणारी व्यक्ती अमर होते असंही कित्येक कथा-कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. एवढंच नाही, त्यांनी रोमन कॅलेंडर आणि कित्येक धर्मांचा अभ्यास करून अशी भविष्यवाणी केली, की हे जग 2060 साली नष्ट होणार आहे.
अखेर एडमंड हॅले (Edmond Halley) या वैज्ञानिकाने न्यूटनला या सगळ्यातून बाहेर आणलं. 'हॅलेज कॉमेट'ला ज्या महान वैज्ञानिकाचं नाव देण्यात आलं आहे, तेच एडमंड हॅले. एक दिवस असंच ते न्यूटनला विज्ञानाबाबत एक प्रश्न विचारण्यासाठी गेले होते. ग्रह सूर्याभोवती अंडाकार कक्षेतच का फिरतात याचं उत्तर त्यांना जाणून घ्यायचं होतं. मात्र, न्यूटनला एका वेगळ्याच विश्वात गेलेलं पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर हॅले यांनी न्यूटनमधील वैज्ञानिक पुन्हा जागा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.