इस्रो प्रमुखांनी केरळच्या ९ वर्षीय मुलाच्या अवकाशाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे दिली.  esakal
विज्ञान-तंत्र

ISRO Chief : २०४० मध्ये अंतराळात जाणार माणूस ; इस्रो प्रमुखांनी ९ वर्षाच्या मुलाला दिले उत्तर

ISRO : जन्मजात डोळ्यांच्या आजाराशी झुंज देणाऱ्या 'या' मुलाला आहे अवकाशाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता

सकाळ डिजिटल टीम

Thiruvananthapuram : अवकाश, अंतराळवीर ग्रह तारे या गोष्टी प्रत्येकाला एक रोमांचक अनुभव देणाऱ्या, नव्या कल्पना मनात जागृत करणाऱ्या असतात. केरळ मधील तिरुअनंतपुरम मधील ९ वर्षाच्या एका मुलाने देखील अवकाशाबद्दल अशी स्वप्ने पाहिलीत. त्याला अनेक प्रश्न पडले. पण त्याला झालेल्या congenital myopia या डोळ्यांच्या आजारामुळे तो उत्तर शोधू शकत नव्हता. त्याच्या अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं ISRO प्रमुखांनी दिली आहेत.

नऊ वर्षीय अनंतपद्मनाभान हा हा जन्मजात दृष्टीदोषाचा सामना करत असला तरी त्याच्या अंतराळ आणि चंद्र या विषयावरील उत्सुकतेला चांगलीच चालना मिळाली आहे. त्याच्या प्रश्नांना थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) के अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी अनुकूलपणे उत्तर दिले आहेत.

अनंतपद्मनाभान डोळ्यांचे उपचार घेत असताना त्याने व्हिडिओ मेसेजद्वारे इस्रोचे प्रमुख श्री. सोमनाथ यांना पहिला प्रश्न विचारला, "भारत अंतराळात मानवांना कधी पाठवणार आहे?" त्यावर श्री. सोमनाथ यांनी एका दिवसात ईमेलद्वारे दुसऱ्या व्हिडिओ मेसेजद्वारे उत्तर दिले. त्यानुसार, इस्रोची 2040 मध्ये अंतराळात मानवांना पाठवण्याची योजना आहे, तर गगनयान मिशन अंतर्गत पुढच्या वर्षीच अंतराळात मानवांना पाठवण्यात येणार आहे,असे त्यांनी सांगितले.

अनंतपद्मनाभानच्या इतर प्रश्नांमध्ये चंद्रावर एलियन्स आहेत का? असा प्रश्नदेखील विचारला. त्यावर डॉ. सोमनाथ यांनी त्यांच्या उत्तरात चंद्रावर एलियन्स नसल्याचे आणि प्राण्यांना अंतराळात पाठवण्याची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

इस्रोच्या अध्यक्षांकडून मिळालेल्या उत्तरांबद्दल आपण खूप आहे. अंतराळशास्त्राबद्दल आपल्याला खूप उत्सुकता आहे. भविष्यात कोणत्या क्षेत्रात काम करणार आहे हे आजू ठरले नाही, पण या विषयाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे, असे याने सांगितले.

अनंतपद्मनाभच्या आई आणि आजोबांनी देखील यावर प्रतिक्रिया देत कौतुक आणि आनंद व्यक्त केला आहे. चे वडील सध्या दुबई येथे कामासाठी स्थायिक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT