Gaganyaan Esakal
विज्ञान-तंत्र

Gaganyaan : 'गगन'भरारी घेण्यासाठी लागणार आणखी वेळ; इस्रो खबरदारी घेत उचलणार पावलं

पुरेसा वेळ घेऊन पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे.

Sudesh

इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम गगनयान सत्यात उतरण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे. या मोहिमेत भारत पहिल्यांदाच अवकाशात माणूस पाठवणार असल्यामुळे, याबाबत मोठी खबरदारी घेण्यात येत असल्याचं इस्रोने स्पष्ट केलं आहे. संस्थेचे चेअरमन एस. सोमनाथ (ISRO Chairman) यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली.

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन स्पेसक्राफ्ट मिशन ऑपरेशन्स (SMOPS-2023) या परिषेदत सोमनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं, की या मोहिमेकडे आम्ही आता वेगळ्या दृष्टीने पाहत आहोत. यापूर्वी 2022 साली गगनयान लाँच होणार होते, मात्र कोरोनामुळे यात विलंब झाला होता. आताही याबाबत आम्ही घाई करणार नाही, असं सोमनाथ म्हणाले.

पहिल्याच प्रयत्नात यश

घाई करून वेळेवर मिशन अबॉर्ट करावं लागण्यापेक्षा, पुरेसा वेळ घेऊन पहिल्याच प्रयत्नात यश मिळवण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे. यासाठी आम्ही चाचणी आणि प्रात्यक्षिकांच्या संख्येत वाढ केली आहे. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी अतिरिक्त अबॉर्ट मिशनचा समावेश या चाचण्यांमध्ये करण्यात आला आहे, असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार गगनयानची (ISRO Gaganyaan) पहिली चाचणी जुलैमध्ये होणार होती. मात्र, आता ही चाचणी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या वर्षी एकूण दोन अबॉर्ट मिशन पार पडतील. तसंच, पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला एक मानवरहित मिशन पार पडेल, असं ते म्हणाले.

दर आठवड्याला चाचण्या

इंजिनच्या सर्व चाचण्या (Gaganyaan test) इस्रोमध्ये पार पडल्या असल्याची माहिती सोमनाथ यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, की दर आठवड्याला काही मोठ्या चाचण्या होत आहेत. आता पुढे अशा आठ मोठ्या चाचण्या पार पडणार आहेत. या सर्व चाचण्या कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडल्या, तर 2024-25 या कालावधीमध्ये आपण लाँच करू शकतो. मात्र, चाचण्यांमध्ये काही अडथळे आले तर हे शेड्यूल बदलू शकते.

पहिली सूर्यमोहिम

यासोबतच सोमनाथ यांनी भारताच्या पहिल्या सूर्यमोहिमेची (ISRO Solar Mission) देखील माहिती दिली. आदित्य L1 असं या मिशनचं नाव आहे. यावर्षीच्या ऑगस्ट ते पुढील वर्षीच्या जानेवारी दरम्यान या मिशनची (Aditya-L1) लाँच विंडो असणार आहे. जर ऑगस्टमध्ये शक्य झालं नाही, तर पुढील वर्षी थेट जानेवारीमध्ये याचं लाँचिंग होईल, असं ते म्हणाले.

चांद्रयान 3

इस्रोच्या तिसऱ्या चंद्र मोहिमेबाबत (ISRO Moon Mission) सोमनाथ यांनी माहिती दिली. जुलैच्या मध्यापर्यंत याचं लाँचिंग होऊ शकतं. चांद्रयान 2 ज्यापद्धतीने लाँच करण्यात आले होते, त्याच पद्धतीने चांद्रयान 3 (Chandrayaan-3) चे देखील लाँचिंग करण्यात येणार आहे. चांद्रयान लँडर हा पूर्णपणे भारतात बनवण्यात आलेला असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार घसरणीसह बंद; मिड-स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी, कोणते शेअर्स तेजीत?

NCP Vidhan Sabha List: राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर,'वडगावशेरी'चा सस्पेन्स कायम! 'या' मतदारसंघांत काय होणार?

IND vs AUS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया हुकूमी पत्ता टाकणार; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियाची गोची करणार

Marathi Movie: सहजीवनाची चटकदार ‘पाणीपुरी’ भेटीला; चित्रपटात झळकणार ४ जोड्या, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Zee Marathi Award 2024 : झी मराठीच्या नायिकांनी साकारल्या नवशक्ती ; प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT