Aditya L1 eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 : 'सूर्यावर' म्हणजे नेमका कुठे जाणार आदित्य उपग्रह?

Sudesh

Aditya L1 Mission : इस्रोच्या पहिल्या सौर मोहिमेची तारीख ठरली आहे. आदित्य उपग्रह हा 2 सप्टेंबरला सूर्याच्या दिशेने झेप घेईल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येईल.

आदित्य-L1 ही मोहीम सूर्याच्या सर्वात बाहेरच्या आवरणाचा अभ्यास करण्यासाठी राबवण्यात येणार आहे. यासाठी आदित्य हा उपग्रह 'एल-1' या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.

हाच पॉइंट का?

'लॅग्रेंज पॉइंट' ही अशी जागा आहे, जिथे पृथ्वीचं आणि सूर्याचं गुरूत्वाकर्षण बल काही अंशी समप्रमाणात लागू होतं. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या कक्षेत उपग्रह सोडल्यास तो त्याच ठिकाणी कायम ठेवण्यासाठी कमी इंधनाची गरज भासते. नासाने या पॉइंटचा शोध लावला होता. आता इस्रो आपला आदित्य उपग्रह याच ठिकाणी ठेवणार आहे.

किती आहे बजेट?

इस्रोच्या या पहिल्या सौर मोहिमेचं बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. 2019 च्या डिसेंबर महिन्यापासून या मोहिमेवर काम सुरू आहे. आता 2 सप्टेंबर 2023 ला याचं लाँचिंग होईल. यानंतर सुमारे चार महिन्यांमध्ये आदित्य उपग्रह L1 पॉइंटवर पोहोचेल.

कसा असेल उपग्रह

या उपग्रहामध्ये सात उपकरणं असणार आहेत. यातील चार उपकरणं सूर्याच्या फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि सूर्याचा पृष्ठभाग म्हणजेच कोरोनावर लक्ष ठेवतील. इतर तीन उपकरणं ही L1 पॉइंटवर असणाऱ्या कणांचा आणि आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : पीएम मित्र पार्क हे एक महत्त्वपूर्ण पाऊल - मोदी

SCROLL FOR NEXT