ISRO Gaganyaan Mission Update : काही दिवसांपूर्वीच इस्रोने हवामान उपग्रह यशस्वीपणे लाँच करून मोठी कामगिरी केली आहे. यानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी पुढील योजनांबाबत माहिती दिली. इस्रो सध्या गगनयान मोहिमेची जोरदार तयारी करत असून, यावर्षी या मोहिमेतील दोन मानवरहित उड्डाणे होणार असल्याचं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
गगनयान मोहिमेची (Gaganyaan Mission) तयारी वेगाने सुरू आहे. यावर्षी दोन टेस्ट फ्लाईट्स असणार आहेत. पुढील टेस्ट फ्लाईट व्हेईकल जवळपास तयार आहे. लवकरच ते श्रीहरीकोटा येथे नेण्यात येईल. पुढील महिन्यापर्यंत हे काम झाल्यानंतर, एप्रिलमध्ये पहिली मानवरहित टेस्ट फ्लाईट पूर्ण होईल; अशी माहिती सोमनाथ यांनी दिली. (ISRO Chief S Somnath)
डॉ. सोमनाथ यांनी सांगितलं, की मानवरहित उड्डाणासाठीचे रॉकेट पूर्णपणे तयार झालं आहे. क्रूड मॉड्यूलवर अद्याप काम बाकी आहे. यासोबतच कित्येक हेलिकॉप्टर ड्रॉप टेस्ट देखील करण्यात येणार आहेत. या चाचणीमध्ये क्रू मॉड्यूलला पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरवण्यात येईल. यातून पॅराशूटची चाचणी देखील पार पडेल.
अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी कोणतीही कसर बाकी ठेवण्यात येणार नाही. यासाठी लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि कित्येक पर्यावरणीय चाचण्या घेण्यात येतील. नवीन रॉकेटच्या मदतीने एक अबॉर्ट चाचणीही घेण्यात येईल. अंतराळवीरांची ट्रेनिंग देखील अपेक्षित वेगाने सुरू आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत सर्व चाचण्या, ट्रायल्स आणि इतर गोष्टी पूर्ण होतील अशी आशा सोमनाथ यांनी व्यक्त केली.
सोमनाथ यांनी सांगितलं, की अबॉर्ट चाचणी ही मानवरहित मोहिमेच्या आधी केली जावी. अनमॅन्ड मिशनमध्ये सर्व्हिस मॉड्यूलऐवजी व्योमित्र (Vyomitra) ही फीमेल रोबोट पाठवण्यात येणार आहे. ही रोबोट पहिल्या मानवरहित चाचणीमध्ये पाठवण्यात येईल की दुसऱ्या याबाबत अद्याप निश्चितता नाही. मानवरहित उड्डाणामध्ये रॉकेटला पृथ्वीची खालची कक्षा 'लिओ'पर्यंत नेण्याची योजना आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.