ISRO Moon Mission eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Moon Mission : आता चंद्राचे नमुने घेऊन येणार इस्रो; नव्या चांद्र मोहिमेवर काम सुरू - रिपोर्ट

Chandrayaan 3 : भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून एक नवा इतिहास रचला आहे.

Sudesh

भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून एक नवा इतिहास रचला आहे. आता यानंतर देशाची अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो' ही पुढील कित्येक मोहिमांवर काम करत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी 'आदित्य' मोहीम लाँच झाली आहे. त्यासोबतच गगनयान मोहिमेची तयारीही जोरात सुरू आहे. या सगळ्यातच इस्रोने आणखी एका चांद्र मोहिमेचे संकेत दिले आहेत.

इस्रोच्या एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 नंतर आता इस्रो आणखी एका चांद्र मोहिमेवर काम करत आहे. भारताच्या आतापर्यंतच्या चांद्र मोहिमा एकतर्फी होत्या. मात्र, आता चंद्रावरुन नमुने घेऊन परत पृथ्वीवर येण्यास सक्षम असणाऱ्या यानावर इस्रो काम करत आहे.

या मोहिमेसाठी इस्रोने अद्याप कोणतीही डेडलाईन निश्चित केली नाही. तसंच याची तयारी कुठपर्यंत आली आहे, याबाबत देखील या अधिकाऱ्याने माहिती दिली नाही. विक्रम लँडरने केलेलं हॉप एक्सपेरिमेंट ही याच मोहिमेसाठीची चाचणी होती. ती यशस्वी झाल्यामुळे आता इस्रो मोठ्या स्तरावर काम करत आहे.

काय होती चाचणी?

3 सप्टेंबर रोजी इस्रोने विक्रम लँडरचं पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केलं होतं. इस्रोने कमांड दिल्यानंतर विक्रम लँडरने आपले इंजिन सुरू केले, आणि स्वतःला सुमारे 40 सेंटीमीटर उंचीपर्यंत वर उचललं. सोबतच तेवढेच अंतर पुढे जात पुन्हा एकदा विक्रमने सॉफ्ट लँडिंग केलं होतं.

जपानसोबत मोहीम

इस्रो भविष्यात जपानसोबत देखील एक चांद्र मोहीम राबवणार आहे. लूनार पोलर एक्सप्लोरेशन (LUPEX) असं या मोहिमेचं नाव असणार आहे. चंद्रावर पाण्याचा आणि अन्य खनिजांचा शोध घेण्यासाठी ही संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT