ISRO Shifts SSLV-D3 Launch to August 16 for Final Development Flight esakal
विज्ञान-तंत्र

ISRO SSLV-D3 Mission Update : इस्रोच्या मिशनची तारीख बदलली; १५ ऑगस्ट नाही तर 'या' तारखेला होणार प्रक्षेपण,यंदाचं मिशन एवढं खास का?

Saisimran Ghashi

ISRO SSLV-D3 Mission : अंतराळ संशोधन क्षेत्रातून एक नवीन अपडेट समोर आली आहे. भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या नवीनतम उपग्रह EOS-08 लाँच करण्याची तारीख बदलली आहे. यापूर्वी हा उपग्रह १५ ऑगस्ट रोजी लाँच होणार होता, असे इस्रोने जाहीर केले होते.

आता हा उपग्रह १६ ऑगस्ट रोजी लाँच केला जाईल. SSLV-D3 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या छोट्या उपग्रह प्रक्षेपण यानाच्या माध्यमातून EOS-08 लाँच केला जाणार आहे. हा SSLV चा शेवटचा विकासात्मक प्रक्षेपण आहे. इस्रोने याबाबतची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली.

या प्रक्षेपणाची वेळ सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपासून एक तास असणार आहे. इस्रोने या एक दिवसाच्या विलंबाचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.

EOS-08 उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सूक्ष्म उपग्रह विकसित करणे, त्यासाठी आवश्यक पेलोड तयार करणे आणि भविष्यातील उपग्रहांसाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे, असे इस्रोने सांगितले.

या उपग्रहात तीन पेलोड आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम-रिफ्लेक्टोमेट्री पेलोड आणि सिरीकन कार्बाइड अल्ट्राव्हायोलेट डोझिमीटरचा समावेश आहे. हा उपग्रह एक वर्ष काम करेल आणि त्याचे वजन १७५.५ किलो आहे. या उपग्रहात अनेक नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले आहेत.

या प्रक्षेपणामुळे SSLV चा विकास प्रकल्प पूर्ण होईल आणि आता भारतीय उद्योग आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेड यांना या प्रक्षेपण यानाचा वापर करण्यासाठी मार्ग मोकळा होईल.

या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारताचे अंतराळ क्षेत्रातले कौशल्य पुन्हा एकदा जगभरात सिद्ध होईल, अशी अपेक्षा देशभरातून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन संपन्न

Dhule Ganpati Visarjan Accident : गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट! धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून तीन बालकांचा मृत्यू; सहा जण जखमी

Phullwanti : "असा मिळाला गश्मीरला नरसिंह शास्त्रींचा रोल" ; प्राजक्ता-गश्मीरने केला खुलासा

Yuvraj Singh: धोनी, विराट, रोहित नाही, तर युवीला त्याच्या ड्रीम टीममध्ये पाहिजे हे तीन खेळाडू

Vladimir Putin: ''लंच ब्रेकमध्येही करा सेक्स..'' पुतीन यांनी देशातील तरुणांना का केलं आवाहन?

SCROLL FOR NEXT