ISRO Scientists S Somnath Party Video eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan 3 : पार्टी तो बनती है! 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केली धमाल; व्हिडिओ समोर

Sudesh

ISRO Moon Mission : भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम यशस्वी झाली आहे. 'चांद्रयान-3'ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग केलं आहे. यामुळे चंद्राच्या या भागात उतरणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. इस्रोच्या या यशावर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

यातच इस्रोच्या वैज्ञानिकांचा जल्लोष करतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. एक मोठी मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर इस्रोचे बहुतांश वैज्ञानिक पार्टी करताना दिसत आहेत. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे अगदी जोशात डान्स करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

पार्टी तो बनती है

इस्रोच्या वैज्ञानिकांचा हा व्हिडिओ मेघ अपडेट्स नावाच्या एक्स हँडलने शेअर केला आहे. यावर नेटकरी देखील चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. एवढ्या मेहनतीनंतर अशा प्रकारे आनंद साजरा करणं हा या वैज्ञानिकांचा हक्कच आहे, ते नक्कीच हे डिजर्व करतात; अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

पुढील मोहिमांची तयारी सुरू

अर्थात, इस्रो काही चांद्रयान मोहिमेनंतर आराम करणार नाहीये. इस्रोने यापूर्वीच 'आदित्य एल-1' मोहिमेची तयारी सुरू केली आहे. ही भारताची पहिली सौरमोहीम असणार आहे. यासाठी आदित्य हा उपग्रह श्रीहरीकोटा येथे नेण्यात आलेला असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

SCROLL FOR NEXT