चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर इस्रोने आदित्य मोहीम देखील लाँच केली आहे. यासोबतच इस्रो पुढील काही मोहिमांवर अगदी वेगाने काम करत आहे. आता शुक्र ग्रहावर जाण्यासाठी आपण सज्ज असून, या मोहिमेची संपूर्ण योजना तयार झाल्याचं एस. सोमनाथ यांनी सांगितलं.
दिल्लीमधील इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीमध्ये आज इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ बोलत होते. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की इस्रो सध्या कित्येक मोहिमांवर काम करत आहे. यातील काही मोहिमा अद्याप कन्सेप्चुअल फेजमध्ये आहेत. तर, शुक्र मोहिमेची तयारी वेगाने सुरू आहे.
इस्रोने शुक्र मोहिमेसाठी शुक्रयानासोबत जाणारे पेलोड तयार केले आहेत. या मोहिमेची योजना देखील तयार असल्याचं सोमनाथ यावेळी म्हणाले. शुक्र हा अगदीच चित्तवेधक ग्रह आहे. त्याचा अभ्यास केल्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रातील कित्येक प्रश्नांची उकल होईल, असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
"शुक्र ग्रहावरील वातावरण हे पृथ्वीच्या तुलनेत 100 पटींनी दाट आहे. तसंच, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ल आहे. या ग्रहाचा पृष्ठभाग कसा आहे याबाबत अद्याप आपल्याला माहिती नाही. कदाचित याचाही शोध लागू शकेल." असंही सोमनाथ म्हणाले.
यापूर्वी युरोपीय स्पेस एजन्सी आणि जपानने शुक्र मोहिमा राबवल्या आहेत. ESA चे व्हीनस एक्स्प्रेस यान हे 2006 ते 2016 पर्यंत शुक्राचा अभ्यास करत होतं. तर, JAXA चं व्हीनस क्लायमेट ऑर्बिटर हे 2016 पासून शुक्राभोवती फिरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.