ISRO Achievement : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी ‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले. अंतराळातील कार्यपद्धती आणि भविष्यातील मोहिमांची सुलभ आखणी करण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरणार आहे.
‘‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊर्जा निर्मिती करता येणार असून त्यातून पाणी मिळणार आहे, आणि कोणतेही उत्सर्जन होणार नाही. भविष्यात अंतराळातील वास्तव्यात ऊर्जा निर्मितीचे हे एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे,’’ असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.
विक्रम साराभाई अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही-सी५८’ या प्रक्षेपकाद्वारे या ऊर्जा प्रणालीचे एक जानेवारी रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. १०० वॉट क्षमतेची पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेंबब्रेन फ्युएल सेल (पीओईएम३)’ आधारित या प्रणालीचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. या चाचणीत हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूच्या मदतीने उच्च दाबाच्या उपकरणात १८० वॉट एवढी ऊर्जा निर्माण करण्यात आली.
‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार ‘फ्युएल सेल’ तंत्रज्ञानाच्या मदतीने हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूतून ऊर्जा निर्माण करण्यात आली. यामधून पिण्याचे पाणी मिळाले आणि कोणतेही उत्सर्जनही झाले नाही. ‘हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूतून हायड्रोजन फ्युएल सेल थेट वीजनिर्मिती करतात. त्यातून शुद्ध पाणी आणि उष्णताही मिळते.
दरम्यान, भारताची पहिली सौरमोहीम ‘आदित्य -एलवन’ शेवटच्या टप्प्यात आहे. आज यानाचा अंतिम व अत्यंत महत्त्वाचा कक्षाबदल होणार आहे, असे ‘इस्रो’ने सांगितले. सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समान असलेल्या ‘लॅग्रांज बिंदू वन’ (एलवन) भोवतालच्या प्रभामंडल कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. पृथ्वीपासून ‘एलवन’चे अंतर १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.