Aditya L1 Point eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Mission : आज 'एल-1' पॉइंटवर पोहोचणार 'आदित्य' उपग्रह; इस्रोने दिली मोठी अपडेट

ISRO Solar Mission : भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या 'आदित्य एल-1' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Sudesh

Aditya L1 Update : भारताची पहिली सौर मोहीम असणाऱ्या 'आदित्य एल-1' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज 'आदित्य' हा उपग्रह एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर प्रस्थापित करण्यात येणार आहे. यासाठी इस्रो आज काही मॅन्यूव्हर पार पाडणार आहे. साधारपणे सायंकाळी चार वाजता ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

2 सप्टेंबर 2023 रोजी 'आदित्य' (Aditya L1 Launch) या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. पृथ्वीवरून सातत्याने सूर्याचा अभ्यास करणं शक्य होत नाही, त्यामुळे अंतराळातील एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवरून हा उपग्रह सूर्याचं निरीक्षण करेल.

एल-1 हा लॅग्रेंज पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. सप्टेंबरपासून प्रवास करत अखेर आज आदित्य उपग्रह या पॉइंटजवळ पोहोचणार आहे. यानंतर या पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये या उपग्रहाला प्रस्थापित केलं जाईल. यासाठी आज सायंकाळी इस्रोतील वैज्ञानिक आणि ISTRAC येथील मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समधील इंजिनियर प्रयत्न करतील.

लॅग्रेंज पॉइंट काय असतात?

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.

एल-1 या लॅग्रेंज बिंदूवर WIND, ACE आणि डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्वेटरी हे नासाचे तीन उपग्रह आधीपासून आहेत. यासोबतच नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तपणे लाँच केलेला सोलार अँड हेलिओस्फेरिक ऑब्जर्वेटरी (SOHO) हा उपग्रह देखील याठिकाणी आहे.

आदित्य उपग्रहासोबत सात पेलोड पाठवण्यात आले आहेत. यातील चार पेलोड हे थेट सूर्याचं निरीक्षण करून त्याचा अभ्यास करतील, तर इतर तीन पेलोड हे सोलार इमिशनचा अभ्यास करतील. पुढील पाच वर्षे आदित्य सूर्याचा अभ्यास करत राहणार आहे. यातून कोरोनल हीटिंग, कोरोनल मास इंजेक्शन, प्री-फ्लेअर आणि फ्लेअर क्रियांची माहिती मिळणार आहे. अंतराळातील हवामानाचा अभ्यासही यामुळे करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT