Mission Mars and Venus sakal
विज्ञान-तंत्र

Mission Mars and Venus : ‘इस्रो’ची यंदा मंगळ आणि शुक्रावर स्वारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सूर्य आणि चंद्रावरील यशस्वी मोहिमांनंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) पुन्हा एकदा मंगळावर आणि प्रथमच शुक्रावर स्वारी करण्याची मोहीम आखली आहे. इस्रोकडून वर्ष २०२४ मध्ये १२ महत्त्वाकांक्षी अवकाश मोहिमांचे नियोजन करण्यात आले आहे.

नव्या वर्षाची सुरवातच आदित्य एल-१ या सौर मोहिमेच्या यशाने झाली आहे. सहा जानेवारी २०२४ रोजी आदित्य एल-१ पृथ्वीपासून सूर्याकडे सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावरील एल-१ या ठिकाणावर पोचला आहे. सौर शोध मोहिमांसाठी आदित्य एल-१ जगाच्या दृष्टीने एक महत्त्वाची उपलब्धी आहे. आदित्य एल-१ च्या यशानंतर २०२४ मधील ‘इस्रो’च्या निवडक मोहिमांचा आढावा...

नासा-इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार (निसार)

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (नासा) आणि इस्रो यांच्यातील महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणून ‘निसार’कडे पाहिले जाते. पृथ्वीच्या निकटच्या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणारी ही अवकाश वेधशाळा दर बारा दिवसांनी जगाचे मॅपिंग पूर्ण करेल. ज्यातून पृथ्वीची परिसंस्था, ध्रुवांवरील बर्फाचे वस्तुमान, जंगले, समुद्राची वाढती पाणी पातळी, भूकंप आणि त्सुनामी यांसारख्या नैसर्गिक धोक्यांवरील सर्वंकष माहिती मिळेल.

गगनयान-१ मोहीम

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेद्वारे पृथ्वीपासून ४०० किलोमीटर अंतरावर तीन जणांना पाठविण्यात येणार आहे. याद्वारे भारताची मानवी अंतराळ उड्डाणाची क्षमता सिद्ध केली जाईल. हिंद महासागराच्या पाण्यात लँडिंग नियोजित करून अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हेही उद्दिष्ट आहे.

शुक्रयान-१ मोहीम

शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी २०२४ या वर्षाच्या उत्तरार्धात ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे. शुक्र ग्रहावरील भारताची ही पहिलीच मोहीम असून, ग्रहावरील वातावरण, पृष्ठभाग आणि भूगर्भशास्त्राचा अभ्यास याद्वारे केला जाईल.

मंगळयान-२ मोहीम

मंगळयान-१ च्या यशानंतर भारत २०२४ च्या उत्तरार्धात मंगळयान-२ चे प्रक्षेपण करण्याची शक्यता आहे. मंगळाचा पृष्ठभाग, वातावरण आणि हवामान परिस्थितीबद्दलची सखोल माहिती मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. नासाच्या पर्सिव्हेरन्स रोव्हरप्रमाणे इस्रोही बग्गी आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश असलेल्या मोहिमेच्या तयारीत आहे.

‘इस्रो’च्या बाहुबली अर्थात ‘एलएमव्ही-३’ या प्रक्षेपकाद्वारे मंगळयानाचे उड्डाण करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळयानाशी संवाद सुनिश्चित करण्यासाठी इस्रो मोहिमेच्या आधी रिले कम्युनिकेशन उपग्रह तैनात करण्याची योजना आखत आहे. ज्याला ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT