ISRO XPoSat Mission eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO XPoSat Mission : काय आहे इस्रोची एक्स्पोसॅट मोहीम? कशा प्रकारे होणार लाँच? जाणून घ्या

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हे प्रक्षेपण होणार आहे. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह PSLV रॉकेटचा वापर करण्यात येईल.

Sudesh

ISRO XPoSat Mission : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारताची अंतराळ संशोधन संस्था एक मोहीम राबवणार आहे. एक्सपोसॅट असं या मोहिमेचं नाव आहे. अंतराळातील मोठ्या प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित कऱणार आहे. उद्या (1 जानेवारी) सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येईल.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन (ISRO XPoSat Launch) हे प्रक्षेपण होणार आहे. यासाठी इस्रोच्या विश्वासार्ह PSLV रॉकेटचा वापर करण्यात येईल. एक्सपोसॅट हा उपग्रह पृथ्वीच्या वरच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. याठिकाणी राहून हा उपग्रह अंतराळातील पल्सर, ब्लॅक होल एक्स-रे बायनरी, अ‍ॅक्टिव्ह गॅलेक्टिक न्यूक्लिया, न्यूट्रॉन स्टार्स आणि नॉन-थर्मल सुपरनोव्हा इत्यादी गोष्टींचा अभ्यास करेल. (XPoSat Mission Objectives)

2017 पासून सुरू झालं काम

या मोहिमेवर इस्रोने 2017 सालापासूनच काम सुरू केलं होतं. एक्सपोसॅट उपग्रहातील टेलिस्कोपची निर्मिती रामन रिसर्च इन्स्टिट्यूटने केली आहे. या मोहिमेचं बजेट हे अवघे 9.50 कोटी रुपये आहे. XPoSat उपग्रहामध्ये POLIX आणि XSPECT हे दोन पेलोड असणार आहेत. यातील पोलिक्स हा मुख्य पेलोड आहे. 126 किलोचा हा टेलिस्कोप अंतराळातील 50 पैकी 40 सर्वात चमकदार प्रकाशस्त्रोतांचा अभ्यास करेल.

कसं होणार प्रक्षेपण

सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल. यानंतर अवघ्या 22 मिनिटांमध्ये तो आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचणार आहे. हा सॅटेलाईट ठरलेल्या कक्षेत पोहोचताच आपलं काम सुरू करेल, आणि ही मोहीम यशस्वी होईल. यानंतर किमान पाच वर्षे हा उपग्रह इस्रोला माहिती देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT