Japan Moon Mission eSakal
विज्ञान-तंत्र

Japan Moon Mission : जपानचं SLIM लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचलं; पुढच्या वर्षी करणार सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न

JAXA SLIM : यापूर्वी देखील जपानने चंद्रावर उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न जपान करणार आहे.

Sudesh

Japan Moon Mission : जपानचं 'स्लिम' हे मून लँडर सध्या चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. अगदी संथपणे प्रवास करत पुढच्या महिन्यात हे यान चंद्रावर उतरणार आहे. पुढील वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात SLIM यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. या मोहिमेला 'मून स्नायपर' असंही म्हटलं जात आहे.

जपानने सप्टेंबर महिन्यात या चांद्र मोहिमेचं प्रक्षेपण केलं होतं. जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA ने आपल्या H-2A रॉकेटच्या मदतीने जपानने XRISM हा सॅटेलाईट आणि SLIM हे लँडर लाँच केले. यानंतर सुमारे चार महिन्यांनंतर आता हे लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. इंधनाची बचत करण्यासाठी एवढ्या संथ गतीने हे लँडर चंद्राकडे पाठवण्यात येत आहे.

यापूर्वी देखील जपानने चंद्रावर उतरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आता पुन्हा एकदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा (Soft Landing) प्रयत्न जपान करणार आहे. विशेष म्हणजे, जपानने चंद्रावर लँडिंगसाठी अगदी छोटीशी जागा निश्चित केली आहे. केवळ 100 वर्ग मीटर जागेत हे यान अचूकपणे उतरवण्यात येणार आहे. यामुळेच या मोहिमेला 'मून स्नायपर' (Moon Sniper) म्हटलं जात आहे. केवळ सॉफ्ट लँडिंगच नाही, तर ठरलेल्या जागेतच लँडिंग करणं हे आमचं लक्ष्य असल्याचं जपानने म्हटलं आहे. (JAXA Moon Mission)

SLIM म्हणजेच 'स्मार्ट लँडर फॉर इन्विस्टिगेटिंग मून' हे अगदी छोटं असं लँडर आहे. चंद्रावरील शिओली क्रेटरवर हे लँडर उतरणार आहे. हे लँडर ज्या ठिकाणी उतरेल, त्याच ठिकाणी राहून चंद्राचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेचं बजेट 831 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT