LignoSat The Wooden Satellite Leading the Fight Against Space Pollution esakal
विज्ञान-तंत्र

Japan LignoSat Satellite : जगातील पहिल्या लाकडी उपग्रहाबद्दल ऐकलंय काय ? हा देश करणार लाँच ; अंतराळातील कचरा होणार कमी!

सकाळ डिजिटल टीम

Japan Space Mission : अंतराळात दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा ही चिंताजनक बाब बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जपानच्या संशोधकांनी आता एक अनोखं पाऊल उचललं आहे. जपानमधील संशोधकांनी लाकडी उपग्रह बनवला आहे.

हे जगातभरातील पहिलं असं उदाहरण असून या उपग्रहाला 'लिग्नोसॅट' (LignoSat)असं नाव देण्यात आलं आहे. सप्टेंबरमध्ये हा उपग्रह अंतराळात पाठवण्यात येणार आहे.

पण हा उपग्रह लाकडी का बनवला? असा प्रश्न कित्येकांना पडला असेल तर, पारंपरिक उपग्रह धातूचे बनवले जातात. हे धातू वातावरणात जळून गेल्यानंतर अंतराळात कचरा निर्माण करतात. हा कचरा इतर उपग्रहांना आणि अंतराळयानांना धोकादायक ठरतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जपानच्या संशोधकांनी लाकडी उपग्रह बनवण्याचा विचार केला.

क्योटो विद्यापीठ आणि जपानमधील सुमिटोमो फॉरेस्ट्री या लाकू कंपनीच्या सहकार्याने हा उपग्रह तयार करण्यात आला आहे. उपग्रहासाठी मॅग्नोलिया (magnolia wood) लाकडाची निवड करण्यात आली आहे. कारण हे लाकूड मजबूत असून अंतराळातील कठोर वातावरणातही टिकून राहू शकते.

हे लाकू सुमिटोमो फॉरेस्ट्रीच्या स्वतःच्या जंगलातून मिळवण्यात आलं आहे. हा उपग्रह सप्टेंबरमध्ये स्पेसएक्सच्या राकेटद्वारे अंतराळात पाठवण्यात येणार आहे. तो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत (ISS) पोहोचेल. तिथे त्याच्या क्षमतेवर आणि तापमानाच्या अचानक बदलांना तोंड देण्याच्या क्षमतेवर परीक्षण केलं जाणार आहे.

सुमिटोमो फॉरेस्ट्रीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, "उपग्रहातून मिळणारा डाटा संशोधकांपर्यंत पोहोचेल. त्यावरून उपग्रहावर ताण पडतोय काय? आणि तो तापमानाच्या बदलांना तोंड देऊ शकतो का हे समजेल."

अंतराळातील कचऱ्याविरुद्धच्या लढाईत हा एक मोठा टप्पा आहे. लिग्नोसॅट यशस्वी झाला तर पर्यावरणपूरक उपग्रहांच्या नवीन युगाचा मार्ग मोकळा होईल असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs BAN, 1st T20I: हार्दिक पांड्या अन् नितीश रेड्डीने केलं भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब, मालिकेतही आघाडी

Palghar News: पालघरच्या किनारपट्टीवर संशयास्पद बोट दिसली, तटरक्षक दलाकडून शोध मोहीम सुरू

Viral Video : 'बुगडी माझी सांडली गं'वर सत्तरी ओलांडलेल्या आजींचा डान्स; नेटकरी म्हणाले, "एक लाख गौतमी पाटील..."

रिऍलिटी शो आहे की सिंपथी... मिताली मयेकरच्या त्या प्रश्नाचा रोख सुरज चव्हाणकडे? नेमकं काय म्हणाली?

Pune Crime : बोपदेव घाट तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर

SCROLL FOR NEXT