Robots Smile with Living Human Skin in Japan esakal
विज्ञान-तंत्र

Smiling Robot : जपानने बनवला चीटी रोबोट! माणसासारखा दिसणार अन् हसणार देखील सेम

Saisimran Ghashi

Robotics Research : रोबोट आणि रोबोटिक्स आता आपल्यासाठी नवीन राहिले नाहीये. पण जपानच्या शास्त्रज्ञांनी रोबोटिक्सच्या क्षेत्रात एक धाडसी आणि विचार करायला लावणारी यशस्वी चाचणी केली आहे. ही बाब मात्र नक्कीच आश्चर्यात टाकणारी आहे. टोकियो विद्यापीठातील प्राध्यापक शोजी ताकेउची यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी रोबोटच्या चेहऱ्यावर जिवंत मानवी त्वचा यशस्वीरीत्या बसविली आहे. एवढेच नाही तर या त्वचेला स्मित हास्य करण्याचीही यंत्रणादेखील बसवण्यात आली आहे.

या भविष्यातील तंत्रज्ञानाची एक झलक देणाऱ्या या संशोधनामुळे शास्त्रीय कल्पना आणि वास्तविकतेमधील सीमारेषा पुन्हा एकदा धुसर झाल्या आहेत. हे यश मानवी त्वचेचा वापर करून अधिकाधिक वास्तववादी रोबोट बनवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. याचा फायदा केवळ मनोरंजन क्षेत्रातच नाही तर कॉस्मेटिक्स आणि वैद्यकीय क्षेत्रातही होण्याची शक्यता आहे.

संशोधकांच्या टीमने मानवी चेहऱ्याच्या आकाराची जिवंत त्वचा तयार केली आणि नाजूक स्नायुसदृश यंत्रणा वापरून या त्वचेला मोठे स्मित करण्यासाठी प्रेरित केले. प्रा. ताकेउची यांनी स्पष्ट केले की, "या कृत्रिम स्नायू आणि आधारांच्या मदतीने आम्ही प्रथमच जिवंत त्वचेची हालचाल करण्यात यशस्वी झालो आहोत."

ही स्मित हास्य करणारी रोबोट्सची निर्मिती ही जैविक आणि कृत्रिम यंत्रणा एकत्रित करण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनाचा परिणाम आहे. जिवंत त्वचा वापरण्याचे फायदे आहेत. धातू आणि प्लास्टिकच्या तुलनेने जिवंत त्वचा वापरणे ऊर्जा कार्यक्षमतेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल तसेच काही बिघाड किंवा नुकसान झाल्यास स्वतःची दुरुस्ती करण्याची क्षमताही या त्वचेमध्ये असते.

पुढच्या टप्प्यात, संशोधकांचे लक्ष्य प्रयोगशाळेत तयार केलेल्या या त्वचेमध्ये रक्तप्रवाह आणि स्नायुंचे जाळे निर्माण करण्याकडे आहे. यामुळे त्वचेवर लावण्यात येणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांची आणि औषधांची अधिक सुरक्षित चाचणी घेणे शक्य होईल. तसेच, रोबोट्सना अधिक वास्तववादी आणि उपयुक्त बनवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

या निर्मितीमुळे काहींना अस्वस्थता वाटू शकते हे संशोधक गट मान्य करते. वृत्तसंस्थांना दिलेल्या मुलाखतीत प्रा. ताकेउची म्हणाले, "यामध्ये थोडीशी भीती वाटण्यासारखे काहीसे आहेच."

ते पुढे म्हणाले की, "रोबोट्सना मानवांसारखीच सामग्री वापरून बनवणे आणि त्यांना आपल्यासारख्याच भावना व्यक्त करण्याची क्षमता देणे हा 'अनकानी व्हॅली' जिंकण्याचा मार्ग असू शकतो." 'अनकानी व्हॅली' ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये जवळपास मानवी असलेले रोबोट लोकांमध्ये रोबोटच्या अस्तित्वाबद्दल अस्वस्थता निर्माण करतात.

हे तंत्रज्ञान विकसित होत असताना, मानव-रोबोट संवाद आणि आरोग्य सेवांपासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रातील त्याच्या भविष्यातील वापराबाबत अनेक विचारांना चालना मिळणार आहे असे चित्र दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Building Collapsed: उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; 8-10 जण अडकले

Duleep Trophy 2024: तिलक वर्मा-प्रथम सिंग यांची शानदार शतके; भारत अ संघाला विजयाची संधी

Crime: भांडुप हादरलं! बोलण्यास नकार; युवक संतापला, रागात महिलेवर चाकूने वार, नंतर स्वत:चा चिरला गळा

Kolkata Doctor Case: पुरावे गायब केल्याचा आरोप; संदीप घोष यांच्यासह पोलीस अधिकाऱ्याला अटक, सीबीआयची मोठी कारवाई

Crime Against Dalit's: लाजिरवाणं! अल्पवयीन दलित मुलाला विवस्त्र करून नाचविलं; सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT