Jio Prepaid Plan 
विज्ञान-तंत्र

Jio चा स्वस्त प्लॅन, डेली 2GB डेटासोबत 1 वर्ष फ्री Disney + Hotstar

सकाळ डिजिटल टीम

Jio Prepaid Plan : वापरकर्त्याच्या गपजा लक्षात घेउन टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात, ज्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, SMS आणि डेटा ऍक्सेस तसेच OTT सबस्क्रिप्शन यांचा समावेश असतो. अनेक वापरकर्ते मोफत OTT सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी जास्त किमतीच्या वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील घेतात. परंतु अनेक दूरसंचार कंपन्या त्यांच्या कमी वैधतेच्या रिचार्ज प्लॅनमध्ये देखील एक वर्षापर्यंत मोफत OTT सबस्क्रिप्शन देतात. जिओ (Jio) ही त्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. आज आपण Jio च्या रिचार्ज प्लॅनमध्ये कमी दिवसांची वैधता, पण OTT सबस्क्रिप्शन संपूर्ण वर्षासाठी मिळते अशा रीचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

Jio चा हा रिचार्ज प्लॅन 499 रुपये किंमतीचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळते. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, हा प्लॅन दररोज 2 GB डेटा देतो. 28 दिवसांची वैधता आणि दररोज 2 GB डेटा मिळणाऱ्या, या प्लॅन अंतर्गत, वापरकर्त्यांना एकूण 56 GB डेटा मिळेल. दैनिक डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत घसरतो.

डेटा व्यतिरिक्त, प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा देखील येतो, ज्यामध्ये ग्राहक पूर्ण 28 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसची सुविधाही उपलब्ध आहे.

आता या प्लॅन अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल बोलूया, जो OTT चे मोफत सबस्क्रिप्शन आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला Disney + Hotstar Mobile चे फ्री सबस्क्रिप्शन मिळते, तेही पूर्ण एका वर्षासाठी. Disney Plus Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शनचीच किंमत 499 रुपये आहे. या किमतीत जिओ तुम्हाला OTT सबस्क्रिप्शनसह इतर बेनिफिट्स देखील देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT