Jio Prepaid Plan 
विज्ञान-तंत्र

Jio Recharge Plan : जीओचे सीम फक्त सुरू ठेवायचंय? खिशाला परवडतो 'हा' परफेक्ट प्लॅन; डेटा, SMS सोबत बरंच काही

रोहित कणसे

आपल्यापैकी बरेच जण दोन सीमकार्ड वारतात, या दोन्हीचा वापर अनेक जणांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. पण हे दोन्ही सीमकार्ड सुरू ठेवण्यासाठी बऱ्याचदा खूप पैसे खर्च होतात. कारण वापर नसला तरी या दोन्हींवर तुम्हाला नियमीत रिचार्ज करत राहावे लागते, ज्यामुळे तुमचे विनाकारण पैसै जातात. आज आपण तुमचे हे सेकंडरी सीम कार्ड अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी आणि गरजेपुरते कॉल यासह डेटा आणि एसएमएस सेवा देणाऱ्या १८९ रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

प्लॅनमध्ये काय मिळतं?

या तुमच्या खिशाला परवडणाऱ्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळते, यासोबत अनलिमीटेड कॉल तुम्ही करू शकता. यासोबतच २ जीबी डेटा देखील मिळतो जो संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएस इतकी कमी होते. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला ३०० एसएमएस आणि जीओ सिनेमा, जीओ क्लाउड आणि जीओ टीव्हीचे बेसीक सब्स्क्रिप्शन देखील मिळते.

यांच्यासाठी बेस्ट प्लॅन

हा प्लॅन ज्यांना फक्त कॉल करायचे आहेत आणि डेटाची ज्यांना फारशी आवश्यकता नाही अशा लोकासाठी परफेक्ट आहे. याच्या किमती मागील वर्षापेक्षा वाढल्या असल्या तरी इतर कंपन्यांच्या तुलनेत सध्या उपलब्ध असलेल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये हा सर्वात किफायतशीर प्लॅन आहे.

महत्वाची बाब म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५जी सेवा मिळत नाही. जीओ वापरकर्त्यांना अनलिमिटेड ५जी सेवा ही फक्त २जीबी दैनंदिन डेटा देणाऱ्या प्लॅन्समध्येच मिळते.

१८९ रुपयांचा प्लॅन तुम्ही देशभरात कुठेही करू शकता, यासाठी तुम्ही माय जीओ अॅप, जीओ डॉट कॉम वेबसाईट किंवा थर्ड पार्टी वेबसाइटचा वापर करून देखील तुम्ही हा रिचार्ज करू शकता. हा प्लॅन घेऊन तुम्ही तुमचे जीओ सीम कार्ड अगदी स्वस्तात शुरू ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT