Mukesh Ambani Sakal
विज्ञान-तंत्र

Jio AIRFIBER : काय आहे हे अनोखे डिव्हाइस, कसे काम करेल? जाणून घ्या सर्व काही

सकाळ डिजिटल टीम

Jio AIRFIBER : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM 2022) आज पार पडली यामध्ये 5G इंटरनेट लॉन्चिंगसह विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. कंपनीने Jio 5G सेवेसोबतच कंपनीने Jio AirFiber डिव्हाईस लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या उपकरणाच्या मदतीने अल्ट्रा फास्ट स्पीड 5G इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑफिसमध्ये आणि घरात वापरली जाऊ शकते. वापरकर्त्यांना एअरफायबरद्वारे वायरलेस ब्रॉडबँड सेवा मिळेल. हे उपकरण गाव आणि ग्रामीण भागासाठी गेम चेंजर डिव्हाइस सिद्ध होऊ शकते.

काय आहे Jio AirFiber

Wireless Jio AirFiber डिव्‍हाइस कंपनीने पूर्वी लाँच केलेल्या Wi-Fi डिव्‍हाइस JioFi ची प्रगत आवृत्ती म्हणून सादर केले आहे. या ब्रॉडबँड सेवेमुळे 2 Gbps पर्यंत अल्ट्रा फास्ट स्पीडवर इंटरनेट उपलब्ध होईल. हे वायरलेस उपकरण घराबरोबरच कार्यालयासाठीही वापरता येते. हॉटस्पॉट उपकरण Jio AirFiber संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट तसेच इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) उपकरणांशी सहजपणे कनेक्ट केले जाऊ शकते.

Jio AirFiber डिव्हाइससह, इंटरनेटचा वापर संपूर्ण घरामध्ये एकाच अल्ट्रा-फास्ट वेगाने केला जाऊ शकतो. या डिव्हाईससह, हाय एंड गेमिंग आणि उच्च दर्जाचे व्हिडिओदेखील कोणत्याही अडथळ्यांशिवाय प्ले केले जाऊ शकतात. कंपनीचा दावा आहे की, वापरकर्त्यांना या डिव्हाइसमधून एंड-टू-एंड ब्रॉडबँड (वायरलेस) सोल्यूशनचा आनंद मिळेल. त्यामुळे हाय स्पीड इंटरनेटसाठी वापरकर्त्यांना इतर कोणत्याही उपकरणाची गरज भासणार नाही. रिलायन्सची ही एक पोर्टेबल वायरलेस ब्रॉडबँड सेवा असणार आहे, जी वापरकर्ते सहजपणे सेटअप करून वापरू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT