JioFinance App : रिलायन्सच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडने त्यांच्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ॲप आणलंय. ते म्हणजे जिओ फायनान्स! आता तुमच्या आर्थिक नियोजनाची आणि व्यवहाराची सगळी कामे एकाच ठिकाणी करता येणार आहे.
हे ॲप अजून बीटा मोडमध्ये आहे, म्हणजेच अजून पूर्णपणे तयार नाहीये, पण वापरण्यास सुरुवात करता येते. याचा फायदा असा असेल की तुम्ही ॲप वापरून तुमचा अनुभव कंपनीला कळवू शकता आणि त्यानुसार ते ॲप मध्ये सुधारणा करत राहतील.
यूपीआय द्वारे पेमेंट करणं, बिल भरणं आणि विमा सल्ला (financial advisor) मिळणं यासारख्या अनेक सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
आता डिजिटल बँक खाते त्वरित उघडून आणि जिओ पेमेंट्स बँक अकाउंटच्या मदतीने बँक खाते ॲपवरुनच सहजतेने हाताळता येईल.
आर्थिक नियोजनासाठी कोणत्या विम्याची आवश्यकता आहे ते जाणून घेण्यासाठी विमा सल्लागाराची मदत घेता येईल.
जिओने नेहमीच ग्राहकांना प्रथम स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळेच हे ॲप वापरण्यास सोपं, विश्वासार्हं आणि पारदर्शी आहे. तुमच्या सूचनांनुसार हे ॲप आणखी चांगलं करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
जिओ फायनान्स बद्दल कंपनीचे प्रवक्ते म्हणतात, "आम्ही 'जिओ फायनान्स' ॲप लाँच करून खूप उत्साहित आहोत. हे ॲप लोकांना आर्थिक व्यवहार करण्याची एक नवीन पद्धत देणार आहे. आमचा उद्देश्य असा आहे की, सर्व सामान्य लोकांना आर्थिक नियोजन सोपं करता यावं. त्यासाठी आम्ही कर्ज, गुंतवणूक, विमा, पेमेंट आणि व्यवहार यासारख्या अनेक सुविधा एकाच ठिकाणी देत आहोत."
ज्यांना आर्थिक नियोजन आणि व्यवहार सोपं करायचं आहे त्यांच्यासाठी जिओ फायनान्स ॲप नक्कीच वरदान ठरणार आहे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.