Jio Prepaid Plans Offer Free Netflix for 84 Days esakal
विज्ञान-तंत्र

Jio Netflix Recharge : जिओ वापरकर्त्यांची चांदी! स्वस्त रिचार्ज प्लॅनसोबत मिळतंय 3 महिन्यांचं Netflix फ्री सबस्क्रिप्शन

Saisimran Ghashi

Jio OTT Recharge Plans : जिओने तुमच्या मनोरंजनाचा डबल डोस वाढवण्यासाठी दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या दोन्ही रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि वेगवेगळ्या डेटा फायद्यांसह मोफत Netflix सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

या नवीन प्लॅन्सची किंमत 1299 रुपये आणि 1799 रुपये इतकी आहे. पहिल्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2GB 4G डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला मोफत Netflix मोबाइल सबस्क्रिप्शन मिळेल. या सबस्क्रिप्शनद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर 480p resolution मध्ये Netflix वरील सर्व चित्रपट आणि मालिका पाहू शकता.

दुसऱ्या प्लॅनची किंमत 1799 रुपये असून यामध्ये तुम्हाला दररोज 3GB 4G डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा मिळतो. यासोबतच तुम्हाला मोफत Netflix बॅसिक सबस्क्रिप्शन मिळते. या सबस्क्रिप्शनद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि स्मार्ट टीव्हीवर 720p resolution मध्ये Netflix वरील मनोरंजन एन्जॉय करू शकता.

आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार तुम्ही हे दोन्ही प्लॅन्स निवडू शकता आणि Jio द्वारे मोफत मिळणाऱ्या Netflix सबस्क्रिप्शनचा फायदा घेऊ शकता.

जिओ कंपनीने जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून रिचार्ज दरांमध्ये प्रचंड वाढ केली. या रिचार्ज दरांच्या वाढीनंतर ग्राहक वर्गातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्राहक अन्य स्वस्त नेटवर्ककडे वळत असल्याचे गेल्या महिन्याभरात दिसून आले आहे. त्यानंतर जिओने काही स्वस्त आणि अनेक ऑफर्स देणारे किंवा OTT सबस्क्रीप्शन फ्रीमध्ये देणारे असे रिचार्ज प्लॅन लॉन्च करायला सुरुवात केली आहे. हा रिचार्ज प्लॅनदेखील Netflix चाहत्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे; कारण बजेटमध्ये 3 महिन्यांचा रिचार्ज आणि Netflix देखील मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT