भारतात टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य कंपन्यांमध्ये असलेली रिलायन्स जिओ आता लॅपटॉपच्या क्षेत्रातही आली आहे. जिओबुक लॅपटॉप लाँच केल्यानंतर आता आता कंपनी क्लाउड लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या लॅपटॉपची किंमत 15 हजार रुपयांपर्यंत असू शकते. अर्थात, याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
ईकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एचपी, लिनोव्हो, एसर आणि इतर कम्प्युटर बनवणाऱ्या कंपन्यांसोबत मिळून जिओ या लॅपटॉपच्या निर्मितीवर काम करत आहे. रिलायन्स जिओ मासिक सबस्क्रिप्शनवर आधारित क्लाउड लॅपटॉप लोकांना अगदी स्वस्तात उपलब्ध करून देऊ शकते.
इलेक्ट्रॉनिक्स, गेमिंग या बाबतीत क्लाउड हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. क्लाउड स्टोरेज, म्हणजे ऑनलाईन एखादी गोष्ट स्टोअर करुन ठेवणे. यामुळे यूजर्सच्या डिव्हाईसवर भरपूर जागा शिल्लक राहते. कंपन्या आपल्या सर्व्हरवर डेटा सेव्ह करून ठेवतात. 'गुगल फोटो' किंवा ड्राईव्ह देखील याप्रमाणेच काम करते.
क्लाउड कम्प्युटर आणि लॅपटॉप देखील याप्रमाणेच काम करतात. यूजर्सना एखादा साधा लॅपटॉप किंवा कम्प्युटर खरेदी करावा लागतो. मात्र, इतर लॅपटॉपप्रमाणे त्यात कोणतंही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची गरज नसते. क्लाउडवर सेव्ह असणारे सॉफ्टवेअर या लॅपटॉपमध्ये थेट वापरता येतात. त्यामुळे स्वस्तातल्या लॅपटॉपमध्येही हाय-एंड परफॉर्मन्स आणि क्वालिटीचं काम करता येतं. (Tech News)
साधारणपणे एखाद्या लॅपटॉपची किंमत ही त्यातील ग्राफिक्स कार्ड, मेमरी, रॅम अशा गोष्टींमुळे वाढते. चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर या गोष्टी हाय-एंड असाव्या लागतात. यामुळेच कित्येकांना महागडे लॅपटॉप घ्यावे लागतात. मात्र, क्लाऊड कम्प्युटरमुळे या गोष्टींची गरजच भासणार नाही. त्यामुळे ग्राहकांना अगदी साधा कम्प्युटर घेऊनही स्वस्तात उत्तम काम करता येणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.