मुंबई : जिओ आपल्या ग्राहकांना खूष करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणत असते. कंपनी ग्राहकांना १ जीबी, २ जीबी किंवा १.५ जीबी डेटा ऑफर करते. आता जिओने आणखी एक ऑफर आणली आहे.
या प्लॅनमध्ये यूजरला डेली डेटासह, व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळणार आहे. यासोबतच जिओच्या काही अॅप्सचा अॅक्सेसही मिळणार आहे. (jio recharge plan with unlimited data free calling free SMS access to jio apps) हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
प्लॅन काय आहे ?
हा प्लॅन फक्त २४९ रुपयांत तुम्हाला मिळेल. यात रोज २ जीबी डेटा वापरता येईल. हा प्लॅन घेतल्यानंतर रोज १०० एसएमएस फ्री मिळतील. तसेच यामधून अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगही करता येईल.
हा प्लॅन २३ दिवसांसाठी आहे. म्हणजेच वर्षभरात ४६ जीबी डेटा मिळेल. जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड, जिओ सिक्युरिटी या अॅपचा कॉम्प्लिमेंट्री अॅक्सेस मिळतो.
२९९ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक
रिलायन्स जिओच्या २९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटानुसार एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.
जिओच्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल उपलब्ध आहेत. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. Jio चा हा प्लान JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.
जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता २३ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटानुसार एकूण ४६ जीबी डेटा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज अमर्यादित व्हॉईस कॉल आणि १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, कंपनी आपल्या ग्राहकांना JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देखील देते.
५३३ रुपयांचा जिओ प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या ५३३ रुपयांच्या प्रीपेड पॅकची वैधता ५६ दिवसांची आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज २ जीबी डेटासह एकूण ११२ जीबी डेटा देण्यात आला आहे.
Jio च्या या प्रीपेड पॅकमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल ऑफर केले जातात. या रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस मोफत मिळतात. या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सारख्या Jio अॅप्सवर मोफत प्रवेश देखील मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.