jio vs airtel all prepaid plans with daily 1gb data and unlimited calling  
विज्ञान-तंत्र

Jio vs Airtel : दररोज 1GB डेटा देणारे प्लॅन, फोन चालू ठेवण्यासाठी आहेत बेस्ट

सकाळ डिजिटल टीम

एअरटेल आणि जिओचे अनेक प्रकारचे प्लॅन सध्या बाजारात उपलब्ध आहेत, परंतु सर्वात लोकप्रिय प्लॅन्स दररोज 1 GB डेटा देणारे आहेत. तुमच्यापैकी अनेक जण हे प्लॅन रिचार्ज करत असतील, पण Airtel आणि Jio मधील कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. लोक दररोज 1 GB डेटा देणारे प्लॅन सर्वाधिक घेतात, कारण शहरातील बहुतेक लोकांच्या घरात वाय-फाय असते. अशा परिस्थितीत केवळ नंबर चालू ठेवण्यासाठी ते असा प्लॅन घेतात. आज आपण Airtel आणि Jio मधील कोणता प्लॅन दररोज 1GB डेटासह येणारा कोणता प्लॅन बेस्ट आहे ते जाणून घेऊया

जिओ Vs एअरटेल

जिओच्या 1GB दैनिक डेटा प्लॅनची ​​किंमत 149 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅनमध्ये 20 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्हाला एकूण 20GB डेटा मिळेल. याशिवाय या प्लॅनसोबत तुम्हाला सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. तसेच तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security अॅप्सचा मोफत एक्सेस मिळेल.

आता एअरटेलच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर 1GB डेटा डेली देणारा प्लॅनची किंमत 209 रुपयांपासून सुरू होते. हा प्लॅन 21 दिवसांच्या वैधतेसह येतो, म्हणजेच तुम्हाला एकूण 21GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये देखील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे आणि दररोज 100 मोफत एसएमएस उपलब्ध असतील.

Jio चा 179 Vs Airtel चा 239 रुपयांचा प्लॅन

जिओचा आणखी 179 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनसह दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.

एअरटेलचा 239 रुपयांचा प्लॅन आहे आणि हा 24 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्येही दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 100 एसएमएस उपलब्ध होतील आणि एअरटेल अॅपचे सबस्क्रिप्शनही मिळेल.

Jio चा 209 Vs Airtel चा 265 रुपयांचा प्लॅन

जिओचा 209 रुपयांचा प्लॅन आहे जो दररोज 1 जीबी डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वरील प्लॅनमध्ये उपलब्ध असलेली सर्व वैशिष्ट्ये देखील उपलब्ध असतील.

एअरटेलचा 265 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची वैधता 28 दिवस आहे. यात अमर्यादित कॉलिंग आणि मेसेजिंग सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

आता विचार केला तर, दररोज 1 जीबी डेटा असलेल्या प्लॅनच्या बाबतीत जिओचा प्लॅन एअरटेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे जिओचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT