JNU Scientist's Discovery Could Revolutionize Malaria Prevention esakal
विज्ञान-तंत्र

Malaria Vaccine in India : भारतात मलेरियाला नो एन्ट्री! जेएनयू मध्ये बनतीये 'ही' प्रभावी लस

सकाळ डिजिटल टीम

Malaria : मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा अभाव आणि मलेरियाच्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे कठीण होत आहे.

पण आता या आजारावर प्रभावी औषध बनण्याची शक्यता दिसत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू,दिल्ली) शास्त्रज्ञांच्या एका ग्रुपने मलेरियाविरुद्ध लसीच्या निर्मितीसाठी आशादायक संशोधन केले आहे. या संशोधनामुळे आजारावर लसी तयार करण्यासाठी नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

प्रा. शैलजा सिंह आणि प्रा. आनंद रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील विशेष आण्विक औषध केंद्रातील (स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिन) शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या जंतू आणि मानवी शरीराच्या पेशींमध्ये होणारा बदल समजून घेतला आहे. इस्सेन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनात महत्वाची भूमिका बजावणारे 'पीएचबी2' (प्रोहिबिटिन) हे जंतूंचे प्रथिन लसी बनवण्यासाठी उपयुक्त असल्याचे संशोधकांचे मत आहे.

प्रा. शैलजा सिंह यांनी सांगितले की, "आमच्या संशोधनात आम्ही एक नवीन PHB2-Hsp70A1A रिसेप्टर लिगंड जोडी ओळखली आहे जी मलेरियाच्या जंतूंना मानवी शरीरात संक्रमण करण्यास रोखते. त्यामुळे जंतुमधील प्रोहिबिटिन प्रथिन ही एक प्रभावी लस बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते."

प्राध्यापकांनी पुढे सांगितले की, "कोविड-19 रोग्याच्या वाढीमुळे मलेरिया संशोधनात काही काळ खंड पडला होता. त्यामुळे मलेरियाच्या रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढला. पण हा नवीन शोध जंतुंमध्ये निर्माण होणाऱ्या औषधप्रतिकारशक्तीशी लढण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याची आशा निर्माण करत आहे."

जेएनयूच्या या संशोधनामुळे भविष्यात मलेरियावर प्रभावी लस मिळेल अशी आशा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT