लिथिमय आयन बॅटरीचा शोध लावणारे, नोबेल विजेते संशोधक जॉन गुडएनफ यांचं सोमवारी निधन झालं. ते १०० वर्षांचे होते. टेक्सस राज्यातील ऑस्टिन शहरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टेक्सस विद्यापीठाने याबाबत अधिकृत माहिती दिली.
जॉन हे टेक्सस विद्यापीठात इंजिनिअरिंगचे प्राध्यापक होते. त्यांनी अशा मटेरियलचा शोध लावला होता, जे उच्च व्होल्टेजमध्येही काम करेल. गुडइनफ यांनी ९० च्या दशकातच कमी वजनाच्या लिथियम आयन बॅटरीचा (Lithium-ion Battery) शोध लावला होता. या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये मोठी क्रांती झाली होती.
नोबेल पारितोषिकाने सन्मान
रिचार्जेबल लिथियम-आयन बॅटरीच्या या ऐतिहासिक शोधासाठी जॉन (John Goodenough) यांना २०१९ साली नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. विज्ञान क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. त्यानंतर त्यांना जगभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये क्रांती
आज आपण वापरत असलेल्या जवळपास सर्व रिचार्जेबल इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये याच लिथियम-आयन बॅटरीचा वापर होतो. मोबाईल, लॅपटॉप, ईलेक्ट्रॉनिक कार-बाईकमध्ये हीच बॅटरी वापरली जाते. आपला हा शोध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एवढी मोठी क्रांती आणेल, असा आपण विचारही केला नव्हता; असं जॉन म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.