keep these important things in mind while buying a new car on loan 
विज्ञान-तंत्र

कर्ज काढून कार विकत घेताय? मग या गोष्टींची नक्की काळजी घ्या

सकाळ डिजिटल टीम

Tips For Buying new Car on Loan : कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, कारण एका कारमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र प्रवास करू शकते. त्यामुळे जर तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि पुरेसे बजेट नसल्यामुळे तुम्हाला ती हप्त्यावर खरेदी करायची असेल, तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. या बातमीच्या माध्यमातून आज आपण हप्त्यावर कार खरेदी करताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेणार आहोत.

क्रेडिट स्कोअर

कर्ज देण्यापूर्वी कोणतीही बँक किंवा फायनान्स कंपनी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासते. तुमचे पूर्वीचे कोणतेही कर्ज किंवा क्रेडिट कार्डचे बिल थकलेले असेल, तर तुम्ही आधी जुने बिल जमा करून तुमचा क्रेडिट स्कोअर दुरुस्त करा, अन्यथा तुम्हाला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

व्याजदरांची तुलना करा

कर्ज घेताना, तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम व्याजदर मिळू शकेल. कार लोन फायनल करण्यापूर्वी इतर बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या व्याजदरांची तुलना करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही तुमचे बरेचसे पैसे वाचवू शकाल. कर्ज घेताना, बँक किंवा फायनान्स कंपन्या तुम्हाला सर्वात स्वस्त कार लोन देतील यासाठी प्रयत्न करा.

कार कंपनीच्या फायनान्स युनीटचे व्यजदर

बर्‍याच कार डीलर्सचे स्वतःचे फायनान्स युनिट असते जिथून तुम्ही हप्त्यावर कार घेऊ शकता, बरेच लोक असा दावा करतात की फायनान्स युनिट कमी व्याजदराने बाहेरून कर्ज मंजूर करते. त्यामुळे तुम्ही एकदा तिथे जाऊन व्याजदराची इतर ठिकाणांशी तुलना करू शकता.

EMI उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसावा

कर्ज घेताना, लक्षात ठेवा की येणारा मासिक EMI तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. कारण जर तुमच्या उत्पन्नातील 50 टक्क्यांहून अधिक रक्कम EMI वर जात असेल, तर तुम्हाला तुमचे मासिक खर्च भागवणे कठीण होऊ शकते. तुम्ही तुमची EMI वेळेवर भरू शकणार नाही.

टर्म आणि कंडिशन (Terms And Conditions) काळजीपूर्वक वाचा

जेव्हा तुम्ही कार लोन घेता, तेव्हा तुम्ही फायनान्सची मुदत आणि अटींवर स्वाक्षरी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: जेव्हा तुम्हाला ऑटोमोबाईल कंपन्यांच्या फायनान्सिंग युनिटकडून कर्ज मिळत असेल, तेव्हा अटी आणि शर्तींचा अवश्य विचार करा. अटी व शर्तींच्या आड काही लपवले जात नाही ना याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT