गेल्या 30 वर्षांत इंटरनेट वितरण तंत्रज्ञानात लक्षणीय सुधारणा झाली आहे. याची सुरूवात डायल-अप कनेक्शनने झाली होती, जी आता फायबर टू होम (एफटीटीटी) आधारित वाय-फायवर पोहोचली आहे. या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व नवीन हार्डवेअर व सॉफ्टवेअरमुळे आता डेटा स्पिड देखील लक्षणीय वाढली आहे. एक्झीटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक विवेक रैना यांच्या मते 2000 च्या दशकाच्या सुरूवातीस कॉपर बेस्ड फिक्स्ड ब्रॉडबँडची कल्पना देशात रुजू लागली.
पण तांब्याचा हा प्रसार बराच मर्यादित होता, ज्यामुळे तेव्हा इंटरनेटचा वेग देखील कमी होता. 2017 मध्ये इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात फायबर ब्रॉडबँड (एफटीटीएच) ची पध्दत स्विकारली. यामध्ये डेटा ट्रान्सफर अत्यंत वेगवान गतीने सुरु झाले. तसेच, डेटा ट्रान्सफरच्या बाबतीत फायबर ऑप्टिक्सने बरीच प्रगती केली.
फायबर ब्रॉडबँडचे फायदे
तांब्यापेक्षा 100Mbps पेक्षा जास्त इंटरनेट स्पिडसाठी ब्रॉडबँड वापरणे चांगले आहे. फायबरमध्ये सिग्नलचे ट्रान्समिशन प्रकाशाद्वारे होते, या माध्यमामध्ये वीज वापरली जात नही त्यामुळे विश्वासार्हतेचे प्रश्न दूर होतात. तसेच, फायबर ब्रॉडबँड डेटा ट्रान्सफरदरम्यान लागणारा वेळ देखील कमी केला जातो. कारण हे वेगवान आहे आणि अधिक क्लिन ट्रांसमिशनसाठी परवानगी देते. सन 2019 मध्ये भारत सरकारने देशातील 250,000 ग्रामपंचायतींमध्ये फायबर टाकण्याची आणि त्याद्वारे सुमारे 600,000 गावे जोडण्याची घोषणा केली. फायबर ब्रॉडबँडबाबत सरकारची वाढती आवड आणि कनेक्शनच्या अनेक फायद्यांमुळे आता भारत एक देश म्हणून फायबर ब्रॉडबँडचा वापर करण्यास तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.