मोबाईलला ठेवा कूल Esakal
विज्ञान-तंत्र

तुमचा Mobile सारखा गरम आणि हँग होतोय, मग या ट्रीक्स येतील कामी, फोन चालेल सुपरफास्ट

बऱ्याचदा महत्वाच्या कामावेळीच मोबाईल हँग होतो. अर्थात मोबाईलमध्ये अनेक अॅप, फोटो , व्हिडीओ तसचं गेम्स असल्याने त्याच्या प्रोसेसरवर लोड आल्याने या समस्या येऊ शकतात. मात्र ही समस्या दूर करणं तुमच्या हातात आहे

Kirti Wadkar

मोबाईल फोन ही सध्याच्या काळात प्रत्येकासाठीच एक महत्वाची वस्तू ठरतेय. केवळ इतरांशी संपर्क साधण्यापुरता फोनचा Mobile Phone वापर आता राहिलेला नाही. तर आता इतर अनेक महत्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन उपयोगात येतो. Keep your mobile cool avoid over heating unnecssary hanging

अगदी फोन बँकिंगसाठी Banking, तसचं फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आठवणी साठवण्यासाठी, मॅपच्या मदतीने पत्ता शोधण्यासाठी अशा महत्वाच्या अनेक कामांसाठी मोबाईल वापरता येतो. यासोबतच मनोरंजनासाठी Entertainment म्हणजेच गेम खेळणं असो किंवा व्हिडीओ पाहणं. याचसोबत ब्राउजर वर विविध माहिती Information शोधण्यासाठी आपल्या हातातील मोबाईल Mobile सध्या उपयोगात येतो. या मोबाईलवर इतक्या सगळ्या गोष्टींचा ताण येत असल्याने अनेकदा मोबाईल हँग होण्याची किंवा तो तापण्याची समस्या निर्माण होते.

बऱ्याचदा महत्वाच्या कामावेळीच मोबाईल हँग होतो. अर्थात मोबाईलमध्ये अनेक अॅप, फोटो , व्हिडीओ तसचं गेम्स असल्याने त्याच्या प्रोसेसरवर लोड आल्याने या समस्या येऊ शकतात. मात्र ही समस्या दूर करणं तुमच्या हातात आहे. तुमचा मोबाईलही ओव्हरहीट होत असेल किंवा हँग होत असले तर आम्ही सांगितलेल्या ट्रीक वापरा.

पहिली ट्रिक

फोनमध्ये देखील बॅकग्राउंडला अनेक फंक्शन ऍक्टिव्ह असतात यामुळे प्रोसेसरवर लोड येत असतो. यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करायचे आहेत.

मोबाईलच्या Settingमध्ये जाऊन Location मध्ये जा.

इथे तुम्हाला Improve Accuracy हा पर्याय दिसेल. हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

त्यानंतर इथे तुम्हाला Wi-Fi scanning आणि Bluetooth Scanning हे पर्याय बंद करायचे आहेत. यामुळे बॅकग्राउंडला सुरु असलेल्या काही प्रोसेस बंद होतील. ज्यामुळे मोबाईल हिंटीग कमी होईल.

हे देखिल वाचा-

दुसरी ट्रिक

दुसऱ्या ट्रीकमध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन Apps हा पर्याय निवडायचा आहे.

इथं तुम्हाला गुगल प्ले सर्व्हिसेस हा पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर Storage मध्ये जा.

इतं तुम्हाला clear Cache वर क्लिक करून ओके करायचं आहे. यामुळे मोबाईलमध्ये असलेल्या जंक फाईल डिलीट होतील.

यानंतर पुन्हा बॅक येऊन Apps Details in store वर क्लिक करून इथे Deactivate करा.

या स्टेप्सनंतर फोन एकदा रिस्टार्ट करा. यामुळे आधीच्या जंक फाइल्स डिलीट होतील.

तिसरी ट्रीक

मोबाईलच्या या ट्रिक बद्दल फार कमी जणांना माहित असेल. यासाठी सेटिंगमधील About Phone मध्ये जा.

इथं तुम्हाला Software Information हा पर्याय निवडायचा आहे.

यात Build Number वर ७ वेळा टॅप करा. यामुळे तुमच्या फोनमध्ये Developer Option ऑन होईल.

या पर्यायामध्ये गेल्यावर तुम्हाला Window animation scale, transition animation scale आणि Animator duration scale या तिनही पर्यायांमध्ये जाऊन 5x सिलेक्ट करायचं आहे.

हे देखिल वाचा-

त्यानंतर खाली तुम्हाला Background process limit हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करून तुम्हाला At most, 1 process हा पर्याय निवडायचा आहे.

यामुळे तुमच्या फोनमधील प्रोसेसरचा बॅकग्राउंड टास्क कमी होईल. परिणामी मोबाईल हँग होण्याची समस्या कमी होईल.

या काही ट्रीक वापरून तुम्ही मोबाईलची ओव्हर हिटिंगची समस्या आणि हँग होण्याची समस्या दूर करू शकता. यासोबतच मोबाईल वापरताना तो गरम होत असेलच तर मोबाईल कव्हर काढणं. वापरात नसलेले ऍप बंद करणं, मोबाईलचा ब्राइटनेस कमी करणं या काही साध्या गोष्टी तुम्ही करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT