Kia Carens Sakal
विज्ञान-तंत्र

Kia Carens: किआचा जलवा! 'ही' ठरली वर्षातील सर्वोत्तम कार, फीचर्स खूपच अफलातून

Kia Carens या एमपीव्हीला 'इंडियन कार ऑफ द इअर' पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kia Carens MPV Details: देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने मोठी कामगिरी केली आहे. कंपनीची Carens ही एमपीव्ही वर्षातील सर्वोत्तम कार ठरली आहे. कारला 'इंडियन कार ऑफ द इअर' पुरस्कार मिळाला आहे. गेल्यावर्षी हा पुरस्कार महिंद्रा XUV700 ला मिळाला होता. तसेच, मर्सिडिज EQS ५८० 'प्रीमियम कार' ऑफ २०२३ आणि EV६ ही 'ग्रीन कार' ठरली आहे.

जबरदस्त लूकसह येते Kia Carens

Kia Carens मध्ये १६ इंच एलॉय व्हील्स, मध्यभागी पातळ लाइट स्ट्रिपसह रॅपराउंड एलईडी टेललॅम्प आणि ORVM वर इंटिग्रेटेड टर्न सिग्नल देण्यात आला आहे. याशिवाय नवीन बोनट स्ट्रक्चर, इंटीग्रेटेड LED डे-टाइम रनिंग लाइट्स (DRL), बंपरच्या खाली दिलेले सेंट्रल एअर इनटेक कारला खास बनवतात. कारचा व्हीलबेस २७८०mm, लांबी ४५४०mm, रुंदी १८००mm आणि १७००mm आहे.

हेही वाचा: Lenovo Tab: 7700mAh बॅटरी, 8GB रॅमसह Lenovo चा शानदार टॅबलेट भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Kia Carens मध्ये मिळेल पॉवरफुल इंजिन

Kia Carens मध्ये १.५ लीटर पेट्रोल, १.४ लीटर पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेल इंजिनचा पर्याय मिळतो. पेट्रोल इंजिन ११५एचपी ते १४० एचपी पॉवर जनरेट तरते. तर डिझेल इंजिन ११५एचपी पॉवर जनरेट करते.

यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी १०.२५ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पुश-बटन स्टार्ट-स्टॉप, क्रूझ कंट्रोल, सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आमि ६४ रंगांची अँबिएंट लाइटिंग देण्यात आली आहे.

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला ३ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये ६-एअरबॅग, पार्किंग कॅमेरा आणि सेंसर्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर्स मिळतील.

Kia Carens ची किंमत

भारतात Kia Carens च्या बेस प्रीमियम (पेट्रोल) मॉडेलची सुरुवाती किंमत १०.२ लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची किंमत १८.८५ लाख रुपये आहे. कंपनीने या गाड्याच्या जवळपास ५० हजार यूनिट्सची विक्री केली आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT