KIA Seltos Specifications : किया इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सेल्टॉस या एसयूव्हीचं नवीन फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं होतं. या गाडीची बुकिंग सुरू झाली असून, २५ हजार रुपये टोकन अमाउंट देऊन तुम्ही ही गाडी बुक करू शकता. कंपनीने आपल्या जुन्या मॉडेलमध्ये काही खास बदल केले आहेत.
कंपनीने आपल्या सेल्टॉस फेसलिफ्टचे तब्बल 18 व्हेरियंट्स उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये तीन प्रकारचे इंजिन आणि पाच प्रकारचे ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात येतील. यातील सगळ्यात बेस व्हेरियंटची किंमत 10.89 रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 19.99 लाख रुपये आहे. (Kia seltos facelift price)
यामध्ये नॅचुरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन असे तीन प्रकारचे इंजिन उपलब्ध आहेत. तसंच, 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड आयएमटी, सीव्हीटी युनिट, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड ड्युअल क्लच असे पाच प्रकारचे ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात येतात. (Car news)
कियाच्या सेल्टॉस फेसलिफ्ट कारला अगदी स्पोर्टी लुक देण्यात आला आहे. जुन्या सेल्टॉसच्या तुलनेत हा लुक अगदी फ्रेश आणि यंग दिसतो. गाडीचे इंटिरिअर देखील अधिक आकर्षक आणि हायटेक करण्यात आले आहेत. (KIA seltos facelift design)
या गाडीमध्ये इन्फोटेन्मेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 10.25 इंच स्क्रीन, मोठा 8 इंच हेड-अप डिस्प्ले, पॅनारोमिक सनरूफ, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्निक, अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईट ऑटो कनेक्टिव्हिटी असे फीचर्स देण्यात आले आहेत. (Kia seltos facelift features)
सेल्टॉस फेसलिफ्टमध्ये जवळपास सर्व प्रकारचे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये लेव्हल-2 एडीएएस, अॅडाप्टिव्ह क्रूज कंट्रोल, ऑटो इमर्जन्सी ब्रेक, रिअल क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, लेन-कीपिंग असिस्ट, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग, 6 एअरबॅग्स, ईबीडी, ईएससी, एबीएस, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, हिल-होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, आयएसओ फिक्स अँकरिंग पॉइंट, 360 डिग्री सराउंड-व्हू कॅमेरा, पार्किंग सेन्सर असे फीचर्स दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.