Best Business Laptops Esakal
विज्ञान-तंत्र

Best Business Laptops: ‘हे’ आहेत २०२३ सालातील बेस्ट बिझनेस लॅपटॉप, कमी बजेटमध्ये मिळतील...

व्यवसाय Business असो किंवा एखादा छोटा बिझनेस लॅपटॉप Laptop घेत असताना अनेकदा मोठा गोंधळ निर्माण होतो. कोणता लॅपटॉप घ्यावा असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला २०२३ या वर्षातील काही बेस्ट बिझनेस लॅपटॉप सांगणार आहोत

Kirti Wadkar

Best Business Laptops: बिझनेस असो किंवा एखादं ऑफिसचं काम अलिकडे सर्वच कामं ही लॅपटॉप वर केली जातात. खास करून करोना काळानंतर लॅपटॉपची मागणी ही वाढू लागली आहे. करोना काळानंतकर अनेकांना स्वत:चे व्यवसाय सुरू केले.

तसंच वर्क फ्रॉम होम Work From Home आणि हायब्रीड वर्क कल्चरमुळे Work Culture डेस्कटॉपची जागा लॅपटॉपने घेतली. संपर्कासाठी मोबाईल हे साधन महत्वाच ठरतंय. तसचं बिझनेस आणि ऑफिसच्या विविध कामांसाठी लॅपटॉप गरजेचा आहे. Know about Best Buisenss Laptops Available in India

व्यवसाय Business असो किंवा एखादा छोटा बिझनेस लॅपटॉप Laptop घेत असताना अनेकदा मोठा गोंधळ निर्माण होतो. कोणता लॅपटॉप घ्यावा असा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठीच आज आम्ही तुम्हाला २०२३ या वर्षातील काही बेस्ट बिझनेस लॅपटॉप सांगणार आहोत. 

लॅपटॉप खरेदी करताना कोणत्या गोष्टी पडताळाव्या

लॅपटॉप खरेदी करताना सर्वप्रथम त्याचे फिचर्स पाहणं गरजेचं असतं. कारण लॅपटॉपच्या फिचर्समुळेच तुमचं काम सोप आणि योग्य रितीने होणार असतं.

बिझनेस लॅपटॉपसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे लॅपटॉपची बॅटरी लाइफ, प्रोसेसर, स्टोरेज कॅपिसिटी आणि पोर्टेबलिटी. तसचं जर एखाद्या व्यवसासायत प्रवास केला जात असेल तर लॅपटॉप हा लाईट वेट म्हणजेच वजनाने हलका असावा. 

१. अॅपल मॅकबुक एअर लॅपटॉप २०२० Apple MacBook Air Laptop- बिझनेस लॅपटॉपमध्ये यंदाच्या वर्षात अॅपल मॅकबुक एअर हा एक बेस्ट पर्याय आहे. खास करून बिझनेसमन आणि डिझायनर्ससाठी हे लॅपटॉप डिझाइन करण्यात आलेले आहे. जास्त वर्कलोड असतानाही या लॅपटॉपमध्ये गरम होण्याची किंवा स्लो होण्याची शक्यता नसते. 

या लॅपटॉमध्ये 8 GB RAM एवढी स्टोरेज क्षमता आहे. तसचं यातील बॅकलीट किबोर्डमुळे तुम्ही कमी उजेडात किंवा अधारातही सहज काम करू शकता. या लॅपटॉपची स्क्रीन १३ इंच इतकी आहे. भारतात या लॅपटॉपची किंमत जवळपास ८७ हजार इतकी आहे. 

हे देखिल वाचा-

२. लिनोव्हो आयडियापॅड ३ Lenovo Ideapad 3- लिनोव्होचा हा लॅपटॉप व्यवसायासाठी एक शक्तीशाली, चांगली पावर आणि ड्युरेबलिटी असलेला पर्याय आहे. ऑफिसच्या कामांसाठी हा लॅपटॉप एक चांगला पर्याय आहे. लाईट वेट आणि स्लिम असलेला हा लॅपटॉप तुम्ही कुठेही सहज नेऊ शकता. 

8 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी स्टोरेजमध्ये देखील लिनोव्हो आयडियापॅड-३ उपलब्ध आहे. यातील प्रीलोडेड विंडोज १० आणि वेगवान प्रोसेसरमुळे  मल्टी टास्किंग काम देखील सहजतेने करू शकता.

ज्यांना एकाचवेळी वेगवेगळ्या विंडो तसचं स्पेडशीटवर काम करावं लागत अशांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. लॅपटॉपच्या अँटी-ग्लेअर स्क्रीनमुळे हानिकारक किरणांपासून डोळ्याचं संरक्षण होतं. भारतात या लॅपटॉपची किंमत साधारण ४४ हजार रुपये इतकी आहे. 

हे देखिल वाचा-

३. HP G8 Core i3 11th Gen Business Laptop : १४ इंचाची स्क्रीन असलेला एचपी च्या या लॅपटॉपमध्ये विंडोज 11 होम ऑपरेटिंग सिस्टम मिळते.

व्हिडीओ कॉन्फर्न्ससाठी उत्तम कॅमेरा आणि 512 GB SSD स्टोरेज तसचं हाय डेफिनेशन डिसप्ले ही या लॅपटॉपची खासियत आहे. 8 GB रॅम असलेल्या या लॅमटॉपमध्ये तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय काम करू शकता. 

४. एसर स्विफ्ट Acer Swift 3- बिझनेस किंवा तुमच्या एखाद्या व्यवसायिक वापरासाठी Acer Swift 3 हा एक उत्तम पर्याय आहे. हा लॅपटॉप १४ इंचाचा असून या अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉपची बॅटरी तुमच्या दिर्घकाळ कामासाठी सर्वोत्तम आहे.

यात 3 54.6Wh क्षमतेची बॅटरी मिळते. या बॅटरीचा १२ तास २ मिनिटांचा वेब ब्राउझिंग तर ९ तास १० मिनिटांचा व्हिडीओ प्लेबॅक बॅकअप आहे. 

५. ASUS Intel Pentium Quad Core Business Laptop- ASUSचा हा लॅपटॉप १५.६ इंचाचा असून खूपच कॉम्पेक्ट आणि लाइट वेट आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक उत्कृष्ट फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असून ऑफिसच्या कामासाठी हा एक उत्तम लॅपटॉप आहे.

1 TB हेवी HDD फिचरसह Windows 10 होम ओएस हे फिचर्स तुम्हाला या लॅपटॉपमध्ये मिळतील, शिवाय हा एक उत्तम बजेट लॅपटॉप आहे. 

या ५ महत्वाच्या लॅपटॉपसोबतच Lenovo V15 Intel Celeron N4020, Lenovo Chromebook C340, Dell XPS 13 Plus, Acer Swift 14 (2023 हे काही उत्तम बिझनेस लॅपटॉपचे पर्याय उपलब्ध आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT