windows key Google
विज्ञान-तंत्र

कंप्युटरच्या माउसएवजी वापरु शकता Windows Key, कसे ते जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

कंप्युटर किंवा लॅपटॉपचा माउस अचानक खराब झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. बर्‍याच फाईल्स आणि पाने माऊसशिवाय सहजपणे उघडता येऊ शकतात. विंडोज की (windows key) च्या मदतीने आपण कोणतेही टास्कबार पेज सहजपणे उघडू शकता. आज आपण विंडोज कीच्या शॉर्टकट लॉजिक विषयी माहिती घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचे काम अधीक सोपे होईल. (know about windows key combination and uses Marathi article)

विंडोज key सह 1 चा वापर

जर आपल्याला पहीले पेज किंवा फाइल माऊसविना उघडायचे असेल तर आपण विंडोज की आणि क्रमांक 1 दाबल्यास टास्कबारवरील पहिले पेज उघडेल. टास्कबारमध्ये गूगल पहिल्या क्रमांकावर असेल तर तुम्ही विंडोज की आणि 1 दाबताच गूगलचं पेज तुमच्यासमोर उघडेल. त्याचप्रमाणे एक्सेल किंवा इतर कोणताही प्रोग्राम दुसर्‍या क्रमांकावर असल्यास विंडोज कीसह २ दाबा. त्याचप्रमाणे टास्कबारवरील पेज सहजपणे उघडली जातात.

विंडोज key सह E वापरा

जर आपल्या लॅपटॉपचा माउस खराब असेल आणि तुम्हाला माय कॉम्प्यूटरमधील काही महत्वाच्या फायली हव्या असतील तर विंडोज की सह ई बटण वापरून थेट माय कॉम्प्यूटरवर जाऊन फाइल पाहू शकता किंवा कंट्रोल सी वरुन कॉपी करुन पेन ड्राईव्हमध्ये पेस्ट करू शकता.

विंडोज key सोबत L वापरणे

जर सिस्टम आणि लॅपटॉपचा माउस खराब असेल आणि आपण सिस्टम बंद देखील करू शकत नसाल तर आपण काय कराल? अशा वेळी स्क्रीन लॉक करणे पसंत कराल जेणेकरून कोणीही फाईल वाचू किंवा पाहू शकणार नाही. स्क्रीन लॉक करण्यासाठी आपण विंडोज की सह एल च्या मदतीने सहज स्क्रीन लॉक करू शकता. त्यानंतर आपण पुन्हा लॉक उघडण्यासाठी हे वापरू शकता.

विंडोज key सह D वापरणे

जर आपण एकाच वेळी बरेच पेज उघडली आणि अचानक माउस खराब झाला तर सिस्टीमच्या डेस्कटॉप मेन पेजवर पोहोचणे खूप अवघड होते. पण, आता तसे होणार नाही. कारण, विंडोज की सह डी वापरताच, आपण उघडलेली सर्व पेज किंवा फायली बंद होतील आणि आपण थेट डेस्कटॉपवर येऊ शकता. या व्यतिरिक्त आपण विंडोज आणि एक्स दाबून कंप्युटरचे इंटरनल मॅनेजमेंट ठिक करु शकता.

(know about windows key combination and uses Marathi article)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT