Know how to block websites in different devices Nagpur News
नागपूर : लहान मुलांकडून स्मार्टफोन्सचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अगदी २-३ वर्षांच्या चिमुकल्यांपासून सर्वजण स्मार्टफोन वापरतात. मात्र तुमची लहान मुलं मोबाईलवर काय बघताहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आजकाल अनेक वेबसाईट्सद्वारे अश्लिलता दाखवण्यात येते त्यामुळे मुलं बिघडू शकतात. तर काही वेबसाईट्सवर अनेक व्हायरस असल्यामुळे फोन खराब होण्याची शक्यता असते. मात्र आता चिंता करू नका या नको असलेल्या वेबसाईट्स तुम्ही आता ब्लॉक करू शकता. या वेबसाईट्स ब्लॉक करण्याच्या काही सोप्या टिप्स आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
Windows 7मध्ये अशी करा वेबसाईट ब्लॉक
- यामध्ये आपण DNS सिस्टमची मदत घेऊन वेबसाईट ब्लॉक करता येऊ शकणार आहे.
- यासाठी तुमच्याकडे कम्प्युटरचा ॲडमिन ॲक्सेस तुमच्याकडे आहे का हे सुनिश्चित करून घ्या. यानंतर ॲडमिन अकाउंटवर साइन इन करा. यानंतर C:\Windows\System32\drivers\etc\ या ॲड्रेसवर जा.
- यानंतर 'hosts' नावाच्या फाईलवर दोनवेळा क्लिक करा. यानंतर नोटपॅड ओपन करा. "# 127.0.0.1 localhost" और "# ::1 localhost" हे तुम्हाला नोटपॅडमध्ये दिसेल.
- जर तुम्ही एडिट करू शकत नसाल तर hosts वाल्या फाईलवर राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टी सिलेक्ट करा. सिक्युरिटी टॅब सिलेक्ट करा. ॲडमिन अकाउंट वर जा आणि एडिट करा.
- पॉपअपमध्ये जाऊन पुन्हा अकाउंट सिलेक्ट करायानंतर फुल कंट्रोलवर क्लिक करा. Apply > Yesवर क्लीक करा. यानंतर OK करा.
- फाईल्सच्या शेवटी ज्या वेबसाईटला ब्लॉक करायचं आहे त्या वेबसाईटचा ॲड्रेस लिहा. त्याआधी 127.0.0.1 हे त्या फाईलच्या आधी लिहा. उदाहरणार्थ तुम्हाला गुगलला ब्लॉक करायचं असेल तर "127.0.0.1 www.google.com" असं टाईप करा.
- यानंतर जितक्या वेबसाईट्सना ब्लॉक करायचं आहे त्या सर्वांना अशा पद्धतीनं प्रोसेस करा. यामुळे तुमच्या Windows 7मधील तुम्हाला नो असलेल्या वेबसाईट्स ब्लॉक होतील.
Macमध्ये अशी करा वेबसाईट ब्लॉक
- यासाठी तुमच्याकडे कम्प्युटरचा ॲडमिन ॲक्सेस तुमच्याकडे आहे का हे सुनिश्चित करून घ्या. Terminal ला ओपन करा.
- लॉगइन डिटेल्स देऊन sudo nano /etc/hosts हे टाईप करा. यामुळे file /etc/hosts हे टेक्स्ट फाईलमध्ये ओपन होईल.
- यानंतर वेबसाईटचं नाव खालच्या लाईनमध्ये टाईप करा. त्याचा फॉरमॅट "127.0.0.1 www.blockedwebsite.com" असा असायला हवा.
- ज्या वेबसाईटला ब्लॉक करायचं आहे त्या सर्व वेबसाईट्ससाठी ही लाईन टाईप करा. शेवटी ctrl+x आणि Y प्रेस करा.
- यानंतर ही sudo dscacheutil -flushcache कमांड द्या आणि एंटर दाबून रिस्टार्ट करा. यामुळे वेबसाईट्स ब्लॉक होतील.
ब्राउझरवरून ब्लॉक करा वेबसाईट
- फायरफॉक्स किंवा क्रोमवरून वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी BlockSite नावाचं ॲडऑन इन्स्टॉल करा.
- त्यानंतर ctrl+shift+a प्रेस करा. त्यानंतर एक्सटेंशनवर क्लिक करा. आता Blocksite वर क्लिक करा.
- त्यानंतर पॉपअपमधील ॲडवर क्लिक करा. यांनतर वेबसाईटचं नाव टाईप करा.
- यानंतर ok वर क्लिक करा. तुम्ही ॲडऑनला सेक्युरिटीही देऊ शकता किंवा पासवर्ड ठेऊ शकता.
आयफोनवर वेबसाईट ब्लॉक करा
- यासाठी सर्वात पहिले Settings > General > Restrictions इथे जा. यानंतर इनेबल रिस्ट्रिक्शनवर टॅप करा.
- आता रिस्ट्रिक्शनसाठी पासकोड सेट करा. यानंतर खाली येऊन वेबसाईवर क्लिक करा.
- यात तुम्ही वेबसाईटचं नाव वाढवू शकता. Add a Website मध्ये जाऊन वेबसाईटचं नाव टाईप करा.
- जर तुम्ही Limit adult content वर क्लिक केलं तर आयफोन त्या वेबसाईट्सना ब्लॉक करेल. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वेबसाईट बघायची असेल तर Never Allow आणि Always Allow असे दोन पर्यायही दिले आहेत.
- Allow Website वर क्लिक करून तुम्ही पासकोड टाईप करून वेबसाईट ओपन करू शकता.
अँड्रॉइड मोबाईलमध्ये वेबसाईट करा ब्लॉक
- यासाठी ES File Explorer इंस्टॉल करा. त्यात वरती असलेल्या "/" या बटनेला टॅप करा. त्यानंतर system > etc वर टॅप करा.
- यामध्ये तुम्हाला Hosts फाईल दिसेल. यानंतर येणाऱ्या पॉपअपमध्ये टेक्स्ट या मेनूवर क्लिक करा. यानंतर ES Note Editor वर क्लिक करा.
- यानंतर डाव्या बाजूच्या ३ बिदूंवर टॅप करा आणि एडिटवर क्लिक करा.
- एडिट करताना फाईलच्या शेवटी नवीन ओळीत यहां पर "127.0.0.1 www.blockedwebsite.com" हे टाईप करा. प्रत्येक वेबसाईटचं नाव नवीन ओळीत टाईप करा. अशा पद्धतीनं त्या वेबसाईट्स ब्लॉक होतील.
- यानंतर आपल्या अँड्रॉइड फोनला रिबूट करायला विसरू नका.
संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.